तभा फ्लॅश न्यूज/बा-हाळी : काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करा व राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुखेड तहसीलदारांमार्फत समनक जनता पक्षाच्यावतीने करण्यात आली. मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सूरू असल्याने त्यासह विविध जनसमस्याबाबत मुखेड तहसीलदार राजेश जाधव यांची भेटी दरम्यान मागण्या करण्यात आले.
यावेळी समनक जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. निळू पवार, अमोल राठोड, शिवा राठोड, संदीप राठोड व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते,शेतकरी, जनता उपस्थित होते.