तभा फ्लॅश न्यूज/नायगांव : अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध रामतीर्थ पोलिसांनी मोठी कारवाई केली असून. टीपरसह तब्बल २५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे व त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे केरूर गावाजवळून एक हायवा टिप्पर MH-26 CH 9612 अडवून तपासणी केली असता त्यात सुमारे ७ ब्रास लाल रेती अवैधरित्या भरून नेण्यात येत असल्याचे आढळले. ही वाहतूक परवाना व कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसताना चोरून नेल्या जात होती.सदर टिप्पर आणि त्यातील रेतीचा एकूण मुद्देमाल २५,३५,०००/- रुपये किमती चा असून.तो रामतीर्थ पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. .
या प्रकरणात साईनाथ बाबाराव मोरे वय ३०, रा. टाकळी, ता. नायगाव याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम ३७९(२) व ज. म.अधिनियम४८(७)नुसार रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.