पंढरपूर – संभाजीनगर येथील भाविक सौ. कहूबाई पांडुरंग सोनवणे यांनी श्री विठ्ठल चरणी स्नेहपूर्वक मौल्यवान सुवर्ण अर्पण केले आहे.
सोनवणे परिवाराने सोने तुळशी माळ अर्पण केली असून तिचे वजन १०.००० मिली ग्रॅम इतके असून किंमत रु. १,१४,०००/- इतकी आहे. तसेच सोने तुळशी हार अर्पण केला असून त्याचे वजन १३.०३० मिली ग्रॅम इतके असून किंमत रु. १,४४,०००/- इतकी झाली आहे.
या भाविकांचा सत्कार विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ह.भ. प. ज्ञानेश्वर जळगावकर महाराज तसेच शकुंतला नडगिरी यांच्या हस्ते करण्यात आला.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्या वतीने भाविकांच्या या भक्तिभावपूर्ण अर्पणाचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, श्री विठ्ठल-रुक्मिणीचे कृपाशिर्वाद सर्व भाविकांवर सदैव राहावेत अशा शुभेच्छा देखील यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
– महेश भंडारकवठेकर