सोलापूर – जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ६८ जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम नियमाने जिल्हा परिषद सदस्य आरक्षण सोडत सोमवारी १३ आॅक्टोबर रोजी पार पडली.यामध्ये जिल्ह्यातील माजी सदस्यांना आरक्षणाचा फटका बसला असून तरूणांना संधी मिळणार आहे.
ही आरक्षण प्रक्रिया जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद अध्यक्षतेखाली झाली. सोलापूर जिल्हा परिषदेच्या ६८ जागांसाठी सदस्य पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये अक्कलकोट तालुक्यातील पान मंगरूळ आणि जेऊर हे दोन जिल्हा परिषद गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने त्या ठिकाणी माजी आमदार सिद्धाराम पाटील आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांना धक्का बसला. तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांना पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये येण्याची इच्छा होती परंतु त्यांचा नान्नज गट ओबीसी सर्वसाधारणसाठी राखीव झाला असल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे. करमाळा तालुक्यात सहा जिल्हा परिषद गटापैकी पाच महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. माजी सभापती विजयराव डोंगरे, उमेश पाटील यांचे जिल्हा परिषद गट सर्वसाधारण झाल्याने ते पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये दिसण्याची शक्यता आहे. तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठा गट अनुसुचित जमातीसाठी आरक्षित झाल्याने माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश हसापुरे यांचा पत्ता कट झाला आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महसूल उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये ही आरक्षणाचे सोडत काढण्यात आली. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी नायब तहसीलदार सुरेंद्र परदेशीमठ, अव्वल कारकून दीपक ठेंगील, मल्हारी नाईकनवरे, पुष्पवती साखरे, प्रताप काळे यांनी सहभाग घेतला. सदर सोडतीसाठी कु. नित्या रविराज नष्टे, वय-५ या बालिकेच्या हस्ते चिठ्ठया काढण्यात आल्या. आरक्षण सोडतीवेळी सोलापूर जिल्हयातील नागरिक मोठया प्रमाणावर उपस्थित होते. आरक्षणासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी देव पाण्यात ठेवले होते; मात्र त्यांच्या पदरी निराशाच आल्याचे दिसून आले.
..,,
चौकट
….
यांचा पत्ता कट
…
जिल्हा परिषद आरक्षण सोडतीत जिल्ह्यातील अनेक दिग्गजांच्या मतदारसंघावर आरक्षण बदलण्यात आल्याने दिग्गजांना फटका बसला आहे. यामध्ये माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवानंद पाटील, माजी कृषी सभापती मल्लिकार्जून पाटील , माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश हसापूरे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक माजी सदस्यांच्या हक्काच्या मतदारसंघात इतर प्रवर्गाचे आरक्षण पडल्याने त्यांना दुसरा मतदारसंघ शोधावे लागणार आहे. त्यामुळे त्यांचा पत्ता कट झाला आहे.
…
आरक्षण तक्ता अभिषेक कडे आहे. कृपया घेणे