सोलापूर – शिक्षण मंत्रालय भारत सरकार व अटल इनोव्हेशन मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात राबविण्यात येत असलेल्या विकसित भारत बिल्डथॉन २०२५ या उपक्रमाचे सोमवार १३ आॅक्टोबर रोजी युट्युब लाईव्ह प्रक्षेपण संपुर्ण भारतभर आयोजित करण्यात आले होते.
विकसित भारत बिल्डथॉन २०२५ उपक्रमाद्वारे इयत्ता वी ते १२ वीच्या देशभतील सर्व विद्यार्थ्यांना विकसित भारत @ २०४७ या संकल्पनेच्या यशस्वीतेसाठी स्कूल इन्होव्हेशन इव्हेंट या प्रक्षेपनाव्दारे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये एकूण ४ थिम्स आहेत. आत्मनिर्भर भारत , स्वदेशी , व्होकल फॉर लोकल व समृध्द भारत या संदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षण सचिव संजयकुमार, आय आय टी दिल्लीचे प्रा. राव यांनी विद्यार्थ्यांना मागदर्शन केले. “भरलो उडान, छू लो आसमान, नये भारत की ये है नई पहचान” हे गीत गाऊन विद्यार्थ्यांच्या इनोव्हेशन इव्हेंटला प्रारंभ झाला.
यावेळी देशभरातील तीन लाख शाळांतून इयत्ता सहावी ते बारावीचे तीस लाख पेक्षा जास्त विद्यार्थी या इव्हेंटला लाईव्ह उपस्थित होते. विकसित भारत @२०४७ हे महत्वकांक्षी ध्येय साध्य करण्यासाठी आपल्या तरुणांमध्ये नवोन्मेष, सर्जनशिलता आणी समस्या सोडवण्याचे कौशल्य वाढवणे आवश्यक आहे, शिक्षणाचा पाया असलेल्या शाळा ही मुल्ये लहानपणापासूनच रुजवण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे. म्हणून या उपक्रमाव्दारे सर्व शालेय विद्यार्थ्यांना एकत्र करुन राष्ट्रीय महत्वाच्या आत्मनिर्भर भारत , स्वदेशी , व्होकल फॉर लोकल लोकल , समृध्द भारत कल्पना, डिझाईन, प्रोटोटाईप तयार करतील. राष्ट्रीय स्तरावर १३ आॅक्टोबर ते २५ आॅक्टोबय पर्यंत प्रोजेक्ट व्हिडीओ सबमिशन करावयाचे आहेत. यास्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रोजेक्ट व्हिडीओ सबमिशन करावयाचे आहेत. यास्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर १० विजेते राज्यस्तरीय १०० विजेते आणि जिल्हास्तरीय १००० विजेते या उपक्रमासाठी एक कोटी रुपयाची रक्कम देण्यात येणार आहे. या उपक्रमात सोलापूर जिल्हयातील २२५९ माध्यमिक शाळांतील इ. सहावी ते १२ वी मधील सर्व विद्यार्थ्यानी सक्रिय सहभाग नोंदविला. या उपक्रमाचा भाग म्हणून सोलापूर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सचिन जगताप यांनी पंढरपूर येथील विवेक वर्धिनी विद्यालय व जुनिअर कॉलेज, पंढरपूर येथे भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या नवोन्मेषी प्रकल्पांची पाहणी करून त्यांना मार्गदर्शन केले.
जगताप म्हणाले की, विद्यार्थ्यांनी समाजातील वास्तव समस्यांवर उपाय शोधण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान व सर्जनशील विचारांचा उपयोग करून देशाच्या प्रगतीत हातभार लावावा. आत्मनिर्भर भारताची उभारणी ही नव्या पिढीच्या कल्पकतेवर अवलंबून आहे. शाळांमध्ये झालेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षिका यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक विद्यार्थ्यांनी पर्यावरण, आरोग्य, शिक्षण व डिजिटल तंत्रज्ञान या क्षेत्रांवर आधारित नाविन्यपूर्ण कल्पना सादर केल्या.या भेटीदरम्यान शिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या संकल्पनांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. चवकसित भारत बिल्डथॉन २०२५ सारखे उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा दाखविण्याची संधी देतात, असेही त्यांनी नमूद केले. या हा कार्यक्रम तीन लाख शाळांमधून तीस लाख विद्यार्थ्यांसमोर पार पडला कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष डॉ. मदन क्षीरसागर, सचिव वैभव टोमके, प्राचार्य यु आर मुंडे, प्रा. ए ए पवार, प्रा. मधुकर भोसले, प्रा. सि डी. चौगुले, मुख्य लिपिक मोरे एच. के व इतर मान्यवर उपस्थित होते.