श्रीपुर – सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांसाठी दिपावली सणासाठी १२६ रु . अंतिम हप्ता देणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी दिली . यावेळी उपाध्यक्ष केलास खुळे , कार्यकारी संचालक डॉ . यशवंत कुलकर्णी उपस्थित होते .
याबरोबरच कामगारांना १४ % बोनस देण्याचीही घोषणा केली .
कारखान्याच्या परंपरेप्रमाणे दिपावली सणासाठी गळीत हंगाम २०२४ / २५ मध्ये गाळप केलेल्या ऊसास प्रति मे.टन रु. १२६ रु- प्रमाणे ऊस बिल ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहे. कारखान्याच्या परंपरेप्रमाणे दिपावली सणासाठी ऊस उत्पादकांना ऊस बिलाचा अंतिम हप्ता दिला असून या हंगामात गाळप केलेल्या ऊसास प्रती मे.टन रु. २९०१ रु इतका दर दिला असल्याची माहिती चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी दिली.
अधिक माहिती देताना परिचारक म्हणाले की कारखाना स्थापनेपासून ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना दिपावली सणासाठी पैशाची गरज असल्याने त्यांना ऊस बिलाचा अंतिम हप्ता देणेची परंपरा कारखान्याच्या व्यावस्थापणाने जतन केली आहे. त्याचप्रमाणे कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांनाही दिपावली सणासाठी बोनस देणेची परंपरा जपली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये व कामगारांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यांने गळीत हंगाम २०२४ / २५ मध्ये गाळप केलेल्या ऊसास आज प्रती मे.टन रक्कम रु. १२६ रु .- प्रमाणे एकूण रक्कम रु.10 कोटी त्याचप्रमाणे कामगार दिपावली बोनस एकूण रक्कम रु. ३.९० कोटी बँकेत वर्ग केली आहे. कारखान्याने ऊस उत्पादकांना एफ. आर. पी. पेक्षाही ज्यादा रक्कम अदा केली आहे.
गळीत हंगाम २०२५ / २६ मध्ये कारखान्याकडे सुमारे १५००० हेक्टर ऊस क्षेत्राच्या नोंदी असून त्यामधून सुमारे १२ ते १३ लाख मे.टन ऊस उपलब्ध होईल. या सर्व ऊसाचे गाळप करण्याचा कारखाना व्यावस्थापनाचा मानस आहे. त्यासाठी कारखान्याची ऑफ सिझन मधील सर्व कामे पुर्ण झालेली असून कारखाना गाळपासाठी सज्ज झाला आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक दिनकरराव मोरे, उमेशराव परिचारक, दिलीपराव चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासाहेब यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे ,भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, सुदाम मोरे, विजय जाधव, हनुमंत कदम, किसन सरवदे, दाजी पाटील, दिलीप गुरव, शामराव साळुंखे, राणू पाटील आदी व कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.