मंगळवेढा – एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस माझे तुझ्यावर खूप प्रेम असून तुझ्यासोबत लग्न करावयाचे आहे असे सांगून घराच्या पाठीमागे नेवून शेतातील बांधाच्या आडोशाला जबरदस्तीने वेळोवेळी शारीरिक संबंध केल्याप्रकरणी आबासाहेब जनार्धन अवघडे (वय 26,रा.जुनोनी) याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला असून पोलीसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील अल्पवयीन मुलगी मजुरीचे काम करते. आरोपी हा टेम्पो चालक असून तो परिसरातील महिलांना द्राक्ष बागेत, खुपरणी करणे,कामास कासेगाव शिवारात घेवून जात असे. यावेळी या महिला सोबत पिडीताही टेम्पोमध्ये बसून कामाला जात असे, त्यामुळे आरोपीची व पिडीतेची चांगली ओळख झाली होती. सहा महिन्यापर्यंत पिडीताही त्या टेम्पोतून प्रवास करत असल्यामुळे आरोपीने तिच्याशी मैत्री करुन जवळीकता निर्माण केली होती. दि.10 मे 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता कामासाठी कासेगावला जाताना पिडीताही आरोपीच्या शेजारी पुढील बाजूस बसली व इतर महिला सर्व पाठीमागे बसल्या होत्या. यावेळी पिडीतेने मी उद्या येणार नाही,लक्ष्मी दहिवडीची यात्रा असल्याने यात्रेला जाणार आहे असे म्हणाल्यावर आरोपीने पिडीतेला तू सोडून जावू नको? तू मला खूप आवडते,मी तुझ्यावर प्रेम करतोय असे म्हणाल्यावर यावर पिडीतेने काहीच उत्तर दिले नाही. त्या दिवशी आरोपीने पिडीतेला दोन हजार रुपये खर्चाकरिता दिले व तुला महत्वाचे बोलावयाचे आहे असे सांगून एक मोबाईल सीमकार्ड घेवून दिले. तसेच एक जुना मोबाईल पिडीतेकडे होता. या मोबाईलमध्ये सीमकार्ड टाकल्यावर आरोपी हा पिडीतेसोबत कॉल करुन बोलत होता. चार महिन्यापुर्वी रात्री 11 वाजता घरातील सर्वजण झोपल्यावर आरोपीने कॉल करुन पिडीतेस तुला भेटावयाचे आहे असे सांगून घराच्या पाठीमागे असलेल्या एका शेतात भेटायला बोलवले. त्यावेळी पिडीता तेथे गेली असता बांधाच्या आडोशाला जवळीक करु लागला. त्यावेळी पिडीता म्हणाली,लग्न केल्यानंतर संबंध कर असे म्हणत असतानाही आरोपीने काहीही न ऐकता पिडीतेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध वारंवार केले असल्याचे पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लातुरकर हे करीत आहेत.