सांगोला – मागील काही दिवसांमध्ये अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी पूर येऊन शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी सांगोला नगरपरिषद अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या बचत गटांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून स्वप्रेरणेने ४५ हजार रुपये रक्कम जमा केली. सदरची रक्कम पूरग्रस्तांना पोचविण्यासाठी सांगोला नगरपरिषदेेेचे मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांच्याकडे सर्व बचत गटांचे प्रतिनिधी म्हणून कर्तव्य शहरस्तर संघाच्या अध्यक्षा सुनंदा घोंगडे, सचिव मनिषा हुंडेकरी, सदस्य ज्योत्स्ना बनसोडे, शकुंतला खडतरे, स्वप्नाली धोकटे यांच्या हस्ते सोमवार दि.१३ ऑक्टोंबर रोजी धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक सचिन पाडे, सहा.प्रकल्प अधिकारी योगेश गंगाधरे, बिरप्पा हाके, शरद थोरात, जयश्री खडतरे, समूह संसाधन व्यक्ती सविता लोखंडे, कोमल चांडोले, सारिका लोखंडे उपस्थित होते.
चौकट-
बचत गटातील महिलांनी पूरग्रस्त शेतकरी बांधवांसाठी केलेली मदत हे समाजासाठी एक आदर्श उदाहरण आहे. पूरग्रस्तांच्या प्रती महिलांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी बद्दल नगरपरिषद आभारी आहे.
-डॉ.सुधीर गवळी, मुख्याधिकारी, नगरपरिषद सांगोला.