सोलापूर – संत रविदास शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचलित यमाईदेवी आश्रम शाळा मार्डी तालुका उत्तर सोलापूर येथील मुलांना आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे यांच्या हस्ते दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे संजय कंदले संचालक चेंबर्स ऑफ कॉमर्स सोलापूर, स्नेहा वनकुद्रे, कविता भस्मे, मंगल पांढरे,संत रविदास शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूरचे संस्थापक अशोक लांबतुरे,संस्थेच्या अध्यक्षा सुरेखाताई लांबतुरे, सचिव मधुकर गवळी,मुख्याध्यापिका रुक्मिणी गवळी, ज्येष्ठ शिक्षक नानासाहेब लोखंडे, महादेव करे, तानाजी तानगावडे, संगीता जाधव, विद्या हराळे, अशोक देशमुख, विनोद कोळेकर, अमोल गुरव, संदीप चव्हाण व विदयार्थी उपस्थित होते.
यावेळी स्वराज आंग्रे व अश्विनी कोळी यांनी शुभेच्छा दिल्या. मोहन डांगरे यांनी आपल्या बालपणीच्या शाळेतील काही आठवणी सांगितल्या. तसेच मुलांनी अभ्यासा बरोबर खेळ, मनोरंजन, विवीध उपक्रम यामध्ये भाग घ्यावा असे सांगितले. सुरेखाताई लांबतुरे यांनी ही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी तानगावडे यांनी केले प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका रुक्मिणी गवळी यांनी केले तर आभार नानासाहेब लोखंडे यांनी मानले.