सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे मजबुती करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित आहे. हे काम पूर्ण व्हावे यासाठी वारंवार शिवप्रेमींनी निवेदन दिले होते. याची दखल घेत मंगळवारी सायंकाळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शिवप्रेमी समवेत पाहणी केली. लेखी पत्र देण्याचे आश्वासन संदीप कारंजे यांनी दिले. आम्ही आजपर्यंत संयम धरला होता, येणाऱ्या काळात जर काम पूर्ण न झाल्यास महापालिकेचे अधिकारी घरी बसतील असे आंदोलन उभा करू असा इशारा श्रीकांत डांगे यांनी दिला.
महापालिका अतिरिक्त आयुक्त संदिप कारंजे, नगर अभियंता सारिका अकुलवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कामाची पाहणी संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, राजन जाधव, भाऊ रोडगे, शिवाजी वाघमोडे, देविदास घुले, गिरीश देवकते, सोमनाथ मस्के यांच्या उपस्थितीत केली.
यावेळी महाराजांच्या पुतळ्याच मजबूती करण आणि सुशोभीकरण करण्या संदर्भात गांभिर्या पुर्वक सुचणा मांडल्या. त्या प्रत्यक्षात याव्यात यासाठी हि शेवटची संधी प्रशासना देण्यात येत आहे. काम किती दिवसात पूर्ण होणार त्याच लेखी पत्र देण्याच संदिप कारंजे यांनी मान्य केले.