सोलापूर – मंद्रूप ते कुरघोट रस्त्याचे काम अनेक वर्षाच्या मागणीनंतरही प्रलंबित आहे . सर्वच सत्ताधार्यांना रस्त्याच्या समस्येबद्दल सांगितल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पावसाळ्यात चार ते पाच फूट पाण्यातून जावे लागत आहे. यामुळे मंद्रूप परिसरातील शेतकरी संतापले असून शेतकरी कमलेश ख्याडे यांच्या नेतृत्वाखाली ७० शेतकर्यांनी जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर उपोषण सुरू केला आहे .
रस्ता बनवा, शेतकऱ्यांना न्याय द्या अशा घोषणा देत शेतकर्यांनी बेमुदत उपोषण सुरू केला आहे . हा रस्ता परिसरातील शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांना अत्यंत आवश्यक असून पावसाळ्यात खड्डे,चिखल आणि वाहतुकीचा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे आजारी व्यक्तींसाठी रुग्णवाहिका पोहोचणेही कठीण होते. ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद पातळीवर वारंवार निवेदने देऊनही काम होत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. दहा दिवसांपूर्वी या संदर्भात आमदार सुभाष देशमुख यांना निवेदन दिले होते.
मंगळवारी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिध्द मुगळे यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर यांची भेट घेऊन अतिवृष्टीबाधित राखीव निधीमधून पंधरा लाख रूपये निधी देण्याची मागणी केली आहे. त्यावेळी तात्काळ या रस्त्याचे आराखडा बनविण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात आले.
यावेळी श्रीशैल सिंदखेडे, निंगप्पा ख्याडे, निरंजन ख्याडे, दत्ता हेळखर, परमेश्वर हेळकर, सिध्दाराम सिंदखेडे, सिध्दाराम ख्याडे यांच्यासह शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...