पंढरपूर – दिवाळीच्या सणा निमित्त येथील केटरर्सच्या कारखान्यांमधून विविध पदार्थ बनविण्याची लगबग दिसत आहे. त्यामुळे कारखान्यांच्या परिसरात अशा खमंग, लज्जतदार पदार्थांची दरवळ सध्या अनुभवयास मिळत आहे. येथील केटरर्सच्या खाद्य पदार्थांना पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरा बरोबरच परदेशातून देखील मागणी होवू लागलेली आहे. त्यामुळे पंढरपूरी पदार्थांची चव आता सर्वदूर पोहचु लागली आहे. सध्या ग्राहकांनी नोंदविलेल्या आँडर्र प्रमाणे फराळांचे पदार्थ बनविण्याचे काम अंतिम टप्पात आले असून आत्ता पर्यंत बनविलेल्या पदार्थांचे पँकिंग करुन ते ग्राहकांना सुपुर्त केले जात आहे.
दरम्यान दिवाळी सण म्हणजे मौज, मस्ती आणि त्या बरोबरच विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांची रेलचेल. त्यामुळे या सणाच्या निमित्ताने प्रत्येक घराघरातून विविध खाद्य पदार्थ बनविण्याच्या तयारीत महिला वर्ग गुरफटलेला दिसत असतो. अलिकडच्या काळात स्वत: पदार्थ बनविण्या पेक्षा केटरर्स कडून बनविलेल्या वेगवेगळ्या प्रकारचे रेडिमेड खाद्य पदार्थ खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढलेला दिसत आहे.
सध्या येथील केटरर्सच्या कारखान्यांमधून बुदींचा मोतिचुर लाडू, तिखट आणि गोड शंकरपाळी, तिखट आणि गोड चिरोटे, बालुशाही, खव्यांची करंजी, साध्या तुपातील बेसनाचे लाडू, साजुक तुपातील बेसनाचे लाडू, खमंग चकली, खास पंढरपूरी चिरमुऱ्यांचा तसेच पोह्यांचा चिवडा, साधी, पालक आणि लसूण शेव, गुलाबजामुन आदी पदार्थ ग्राहकांनी अगोदरच नोंदविलेल्या आँर्डर प्रमाणे बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. कारखान्यांमधून जो माल तयार झालेला आहे त्याचे पँकींग करुन आँर्डर नुसार ग्राहकांना त्याची डिलिव्हरी देण्याचे काम सुरु झालेले आहे.
———————–
( महागाईमुळे फराळांच्या किंमतीमध्ये वाढ )
फराळाच्या पदार्थांच्या किंमती मध्ये यंदा महागाईमुळे कमालीची वाढ झालेली आहे. स्वत: फराळांचे पदार्थ बनविण्या पेक्षा केटरर्सकडून बनविलेल्या रेडिमेड पदार्थांना सध्या ग्राहकांकडून जास्त मागणी असल्याचे येथील वेगवेगळ्या केटरर्सकडे नोंदविण्यात आलेल्या पदार्थांच्या आँर्डर वरुन लक्षात येत आहे.
———————————-
( फराळांच्या पदार्थाचे सरासरी एक किलोचा दर )
मोतीचुर लाडू (२९०),बेसनलाडू (३१०), शंकरपाळी (२९०), खारीशंकर पाळी (२९०),कांदाशंकरपाळी (२०० ग्रँम ), बालुशाही (२९०), खारीबुंदी (३००), गोडचिरोटे (२९०), खारे चिरोटे (३००), साधी शेव (२९०), लसूण शेव (३००), पालकशेव (३००), करंजी (४३०), पातळपोहे चिवडा (२९०), दगडी पोहे चिवडा (२९०), चिरमुरे चिवडा (२२०), रसमलाई (५००), गुलाबजामुन (३५०), साजुक तुपातील मोतिचुर (६००), बदामपुरी चिरोटे साजुकतुपातील बेसनलाडू (५८०), चकली भाजणीची (३४०), शेंगादाणा चटणी (२४०), अनारसे पीठ (२५०),अनारसे (४६०), निपुट्टी वडा (कर्नाटक पदार्थ – ५३० रुपये )आळुवडी (कोकणातील २०० ग्रँम ११० रुपये), रवा लाडू (२९०),रवा बेसन लाडू (२००), भाजके पोहे चिवडा (३००)
———————-
वेगवेगळ्या पदार्थांच्या व्हरायटी खवैय्यांना उपलब्ध होत असल्याने केटरर्सकडून बनविलेल्या रेडिमेड पदार्थांना मागणी वाढत आहे.
नीता जोशी ( परिपुर्ण केटरर्सच्या प्रमुख )
————————
रोजच्या धकाधकीच्या जीवनात सर्व कुटुंबातील सदस्य फार क्वचित प्रसंगी एकत्र येत असतात. त्यामुळे सणाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी व घरातील महिला वर्गाला देखील थोडा विरंगुळा म्हणून आम्ही प्रत्येक वर्षी दिवाळी मध्ये दर्जेदार रेडिमेड खाद्य पदार्थांची खरेदी करीत असतो.
सौ. रेखा टोमके ( ग्राहक )