सोलापूर – जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांनी पशुधन बचाव मोहीमे अंतर्गत पूरग्रस्त मुक्या जनावरांना पशुखाद्य वाटपाचा उपक्रम समाजाला दिशादर्शक ठरणार असल्याचे गौरवोद्गार मुख्य कार्यकारी अधीकारी कुलदीप जंगम यांनी सेवानिवृत्त शिक्षकांकडून ७ टन पशुखाद्य वाटप करण्याच्या कार्यक्रमात काढले
सीना नदीच्या महा पुराने बाधीत झालेल्या गावातील जनावरांना पशुखाद्य सेवानिवृत्त शिक्षकांनी दोन लाख ६० हजार रकमेतून ७ टन पशुखाद्य खरेदी केली . त्याचे वाटप प्रातिनिधिक स्वरूपात १० शेतकर्याना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधीकारी दालना समोर वाटप करण्यात आले . यावेळी शिक्षणाधिकारी कादर शेख, पशुधन उपायुक्त डाॅ. विशाल येवले उपस्थित होते
यावेळी सुभाष फुलारी सिध्देश्वर धराडे, रमेश गायकवाड,, शंकरराव सावंत, कुंदा राजगुरू, काळप्पा सुतार, मल्लिकार्जुन बडदाळ सिद्राम जिरगे चन्नमलप्पा चिट्टे भिमाशंकर म्हेत्रे, बादशहा मुल्ला शिवाजी पाटील, वीरभद्र यादवाड, संजय देवकाते वसंत दिघे आदी उपस्थित होते.