अकलूज – सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील कारखान्याच्या संचालिका माननीय कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांची दि डिस्टिलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई चे संचालक पदी नुकतीच निवड केली असल्याचे असोसिएशनने जाहीर केले आहे.
यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषद सदस्य तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ च्या सिनेट सदस्य म्हणून काम पाहिले आहे. सध्या त्या प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा आहेत. सहकार, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात व सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्या कार्यरत आहेत. सध्या विविध क्षेत्राच्या माध्यमातून कार्यरत राहून स्वतः च्या कार्याचा उत्तम ठसा उमठविलेला आहे. सहकार महर्षी कै. काकासाहेब व आक्कासाहेब यांच्या आशीर्वादाने व माननीय विजयसिंह मोहिते-पाटीलसाहेब, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाने व कारखान्याचे चेअरमन, जयसिंह मोहिते-पाटील (बाळदादासाहेब) यांच्या कुशल नेतृत्व व मार्गदर्शनामुळे त्यांना ही संधी उपलब्ध झाली आहे.
साखर उद्योगांमधील डिस्टिलरी व्यवसाय निगडित राज्याच्या असोसिएशन मध्ये सदस्य म्हणून निवड झाल्यामुळे अडीअडचणी व त्याची सोडवणूक तसेच शासकीय स्तरावरील विविध मान्यता व धोरण ठरविण्यामध्ये त्यांना सहभागी होण्याची संधी प्राप्त झालेली आहे. त्यांच्या पुढील कार्यासाठी आणखी एक संधीच दालन खुले झाले आहे या निवडीने कारखाना परिसरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचे औचित्य साधून कारखान्याच्या सर्व खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांनी नुकताच त्यांचा सन्मान केला. याप्रसंगी शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे सभापती, मा.चिरंजीव सयाजीराजे मोहिते-पाटील तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. राजेंद्र चौगुले व खातेप्रमुख, अधिकारी व युनियन प्रतिनिधी, कर्मचारी बंधू उपस्थित होते.