श्रीपूर – श्रीपूर ता . माळशिरस येथिल मुन्ना पठाण व रमेश साळुंखे या जीवलग मित्रांचे चोवीस तासांचे अंतरात निधन झाल्याने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे .
मुन्ना पठाण व रमेश साळुंखे येथिल ब्रिमा सागर डिस्टलरी या कंपनीचे सेवा निवृत्त कामगार . दोघांची जिवलग मैत्री होती . मुन्ना पठाण हे कामानिमित्त १३ ऑक्टों . सोमवारी फलटण येथे गेले होते . तिथे त्यांना अचानक त्रास होऊ लागल्याने त्यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले . ही वार्ता तातडीने श्रीपूर मध्ये येवून थडकली . कंपनीत एकत्र काम करत असलेला आपल्या मित्रांचे निधन झाल्याचे ऐकून रमेशला तीव्र दुखः झाले . त्याने मित्राला फेसबुक वर पूर्वी वाढदिवसा निमित्त गुलाबाचे फुल देताताचा फोटो शेअर करून श्रधांजली अर्पण केली .मुन्ना पठणचा रात्री दफनविधी झाला .
मात्र मंगळवारी सकाळी १० वा चे सुमारास रमेशला अत्यवस्थ वाटू लागले व काही वेळातच हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले .
ही वार्ता शोशल मिडीयातील नेटकऱ्यांसाठी हा फोर मोठा धक्का होता . या दोन सच्चा मित्रांच्या अकस्मित जाण्याने सोशल मिडिया तसेच श्रीपूर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे .
पांडुरंग सहकारी साखर कारखान्यातील कामगार अमर पठाण यांचे तर सुशांत साळुंखे यांचे ते वडिल होत .