अक्कलकोट – राष्ट्रीय समाज पक्ष अक्कलकोट शहर व तालुका यांच्या वतीने अक्कलकोटचे निवासी नायब तहसीलदार दत्तात्रय गायकवाड यांना निवेदनाद्वारे शेतकऱ्यानां हेक्टरी ५० हजार रु मदत देण्याची मागणी तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर यांनी केली .
अतीवृष्टी पावसाने पिकांचे झालेल्या नुकसानी चे पंचनामा करुन त्यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी याबाबत निवेदन देण्यात आले . यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर, अक्कलकोट शहर अध्यक्ष निलेश लवटे, अक्कलकोट तालुका युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष संतोष शिंदे, अक्कलकोट तालुका उपाध्यक्ष रेवणसिध्द शेरी,वाहतूक आघाडीचे तालुका उपाध्यक्ष बिरप्पा मैंदर्गी, बादोल्याचे माजी सरपंच गौरीशंकर गायकवाड, अमित माडेकर, अशोक देवकर, प्रमोद देवकर, अनिल सरवदे, धुळबा काळे, सिध्दू नकाशे, म्हाळप्पा पुजारी, सुरेश जाधव आदी उपस्थित होते.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, अक्कलकोट तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप पिक तुर,मुग, सोयाबीन, मका, सूर्यफूल, भुईमूग, कांदा आधी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेला पिके जळून जात आहेत. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून आपल्या शेतात पेरणी केली. मात्र सतत पाऊस अती वृष्टीमुळे आता शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळ गाव कामगार तलाठी तसेच मंडळ अधिकारी यांना तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे शासनाकडे त्वरीत सादर करावे.
अक्कलकोट तालुका ओला दुष्काळ जाहीर करावे शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी . शासनाकडून मदत न मिळाल्यास पुन्हा शेतकरी आत्महत्यांचे घटना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी आपण या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर यांनी केली आहे.