आक्कलकोट – श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या कर्मचारी व सेवेकऱ्यांना दिवाळी निमीत्त देवस्थानच्या वतीने एका महिन्याच्या वेतना इतके बोनस (दिवाळी स्वामी प्रसाद) व मुंबई येथील स्वामी भक्त ॲड.मधुकर वैद्य व सहकारी यांच्या वतीने मिठाई वाटप करण्यात आले. यावेळी विबोधी महीला फाऊंडेशनच्या वतीने देवस्थानच्या महीला सेवेकऱ्यांना उटणे पाकीटांचेही वाटप करण्यात आले. मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व ॲड.मधुकर वैद्य यांच्या हस्ते या पुण्य कार्याची सेवा संपन्न झाली.
याप्रसंगी बोलताना ॲड.वैद्य यांनी श्री स्वामी समर्थांचे आपण निस्सिम भक्त असून स्वामींच्या सेवेतच आपले जीवन व्यतीत करणाऱ्या सेवेकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने देवस्थानच्या वतीने बोनस व आमच्या वतीने मिठाई वाटप करुन देवस्थानच्या सेवेकऱ्यांची दिवाळी गोड केल्याचे समाधान आम्हास व देवस्थान समितीस असल्याचे मनोगत व्यक्त केले. सर्व सेवेकरी व कर्मचाऱ्यांनी या स्वामी प्रसाद व मिठाईचा लाभ घेतला.
यावेळी प्रथमेश इंगळे मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, ईश्वर परदेशी, प्रा.शिवशरण अचलेर, प्रसाद सोनार, जयप्रकाश तोळणूरे, गिरीश पवार, संजय पवार, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव, स्वामीनाथ लोणारी, ऋषिकेश लोणारी, मोहन जाधव व अन्य कर्मचारी सेवेकरी उपस्थित होते.