साेलापूर – पादचारी रस्ता क्रॉस करीत असताना अज्ञात चार चाकी वाहनाने धडक दिली,या धडकेत गंभीर जखमी होवून एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोलापूर पुणे महामार्गावरील एमआयटी कॉलेज जवळ घडली आहे.
यावरून अज्ञात वाहन चालकांवर फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिरू लवटे (रा. तिऱ्हे ता उत्तर सोलापूर)असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत विजय श्रीरंग लवटे (रा. तिऱ्हे,ता उत्तर सोलापूर) यांनी फिर्याद दिल्याने फौजदार चावडी पोलिसांत मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय लवटे यांचा भाऊ बिरू लवटे हा एमआयटी कॉलेजजवळ पायी रस्ता क्रॉस करीत होता, पुण्याकडून साेलापूर जाणाऱ्या चार चाकी वाहन भरधाव वेगाने येवून त्यांना जोराची धडक दिली, या धडकेत त्याच्या डोक्यास व पायाला गंभीर जखम करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाला आहे. या प्रकरणाचा तपास सहा पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील हे तपास करीत आहेत.