पंढरपूर – सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दिपावली सणासाठी सवलतीच्या दरात देण्यात येणाऱ्या साखर विक्री केंद्राचा शुभारंभ चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक मंडळ यांच्या ठरलेल्या धोरणानुसार ऊस उत्पादक सभासद,बिगर सभासद शेतकरी यांना दिपावली सणानिमित्त् सवलतीच्या दराने प्रत्येकी 50 किलो साखरेचे वाटप कारखाना कार्यस्थळावर पंढरपूर येथील कार्यालया समोरील मठामध्ये साखर विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे.
कारखान्याचे व्हा.चेअरमन भारत कोळेकर यांचे हस्ते सदर साखर विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संचालक मोहन नागटिळक, परमेश्वर लामकाने, सुनिल सराटे, कंत्राटदार रामचंद्र कौलगे, रामचंद्र भुसनर, माजी संचालक काका म्हेत्रे, वसंत फाटे, प्र.कार्यकारी संचालक पी.डी.घोगरे, मुख्य शेती अधिकारी हणुमंत जाधव, शेती अधिकारी प्रतापराव थोरात, परचेस ऑफिसर चंद्रकांत कुंभार, कार्यालयीन अधिक्षक माऊली कुंभार, ऊस उत्पादक सभासद शेतकरी, ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर साखर विक्री सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार असून, सदर साखर विक्री दि.१६ऑक्टोंबर पासून दि.१० नोव्हेंबर, २०२५ पर्यत सुरु ठेवण्यात येणार आहे. साखरेचे कुपन चिटबॉय मार्फत सर्व सभासदांना घरपोच करण्यात येणार असून, सर्व कुपनधारकांनी साखर कुपनासह स्वत:चे आधारकार्ड किंवा ओळखपत्र दाखवून साखर घेण्यात यावी तसेच ऊस उत्पादक शेतकरी यांनी आपला ऊस कारखान्यास गळीतास देण्याचे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.डी. घोगरे यांनी केले आणि सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.


















