सोलापूर – “गोसेवा हीच देशसेवा, गोसंवर्धन हीच राष्ट्रसेवा!” या भावनेतून वि . दा. सावरकर चॅरिटेबल प्रतिष्ठान संचलित जय संतोषी माता गोशाळा, सोलापूर वसुबारस निमित्त गोमातेचे पूजन अत्यंत श्रद्धा व भक्तिभावाने संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र शासन नियुक्त मानद पशु कल्याण अधिकारी मुंबई उच्च न्यायालय समिती नियुक्त श्री. केतनभाई शहा, यांनी उपस्थित राहून त्यांच्या हस्ते गोमातेचे पूजन केले आणि
या प्रसंगी विश्व हिंदू परिषद अभिमन्यू डोंगरे महाराज , पुष्पलता ताई महाराज पाटील इंचगिरी मठ, विश्व हिंदू परिषद गोरक्षा गोसंवर्धन विभाग सोलापूर पुरोहित प्रभाकर गाजरला विनोद कोंडा पेंटप्पा गड्डम, श्. , श्री. दशरथ गोप, श्री. श्रीधर वडनाल, श्री. शैलेश बुलबुले, श्री. राजू राठी अंबादास भिंगी डॉक्टर नितीन बलदवा प्रभाकर गुंडू डॉक्टर महेश दुलंगे डॉक्टर अंबादास गाजून रमेश नल्ला, श्री. हरिदास पोठाबत्ती, डॉक्टर राजेंद्र गाजुल व सौ पुष्पलता गाजुल सेक्रेटरी नागनाथ पोरंडला नागेश सरगम मुफ्ती कमटम., नागनाथ सोमा, अविनाश माने,आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी गोमाता गोमातेला चांदीचे अलंकार घालून सजावट करण्यात आली पूजनानंतर गायींना नैवेद्य अर्पण, दीपदान, आणि पर्यावरणपूरक गोमय–गोमुत्रावर आधारित उत्पादने यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. श्रद्धाळू गोभक्तांनी “गाय ही आई आहे” या भावनेने पूजन करून वसुबारसचा अर्थ अधिक अर्थपूर्ण केला.
कार्यक्रम स्थळ: श्री मार्कंडेय उद्यान, अशोक चौक, सोलापूर वेळ: सायं. ४ ते ७
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन जय संतोषी माता गोशाळा अध्यक्ष डॉ. राजेंद्र गाजुल व सचिव श्री नागनाथ पोरंडला यांनी केले. त्यांनी सर्व उपस्थित गोभक्तांचे मन:पूर्वक आभार मानले आणि गोसंवर्धनासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.
“गाय ही संस्कृतीची माता — तिचे रक्षण हेच राष्ट्रसेवेचे खरे रूप.”