सोलापूर : राहत्या घराच्या गच्चीतून अचानक तोल जाऊन पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला. हा प्रकार पंढरपूर येथील आदर्श नगर येथील शहनाई गार्डनजवळ गुरुवारी दुपारी 12 च्या सुमारास घडला.
कालेश्वर शिवनारायण मेश्राम (वय 30 , रा. पंढरपूर) असे तरुणाचे नाव आहे. कालेश्वर हा त्याच्या शहनाई गार्डनजवळील घराच्या गच्चीत थांबला होता. अचानक तोल जाऊन तो खाली पडल्याने त्याच्या डोक्याला जखम झाली. पंढरपूर व मोहोळ येथील सरकारी रुग्णालयात उपचार करून दुपारी चारच्या सुमारास भाऊ दिनेशकुमार याने दाखल केले. परंतु उपचारापूर्वी तो मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.