सोलापूर : शेतात पाणी देत असताना रान डुकराने शेतक-याच्या पायाला चावा घेतला तसेच डोक्याने मारले. ही घटना मोहोळ तालुक्यातील आपटी येथे गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
सत्यवान आप्पा कांबळे (वय 30) असे डुकराने चावा घेतलेल्या शेतक-याचे नाव आकहे. सत्यवान हा गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आपटी गावाच्या परिसरातील शेतातील पिकाला पाणी देत होता. तेव्हा अचानक तेथे आलेल्या रान डुकाराने त्यास डोक्याने मारले. त्यानंतर दोन्ही पायाली चावा घेतला. गावातील खासगी रुग्णालयात उपचार करून आई झुंबर यांनी रात्री 11.45 वाजता शासकीय रुगणालयात दाखल केल्याची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.