जालना – सण आणि उत्सावाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त अन्नपदार्थाची व्रिक्री होण्याची शक्यता असते. अशा भेसळयुक्त अन्न पदार्थामुळेमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांनी बैठकीमध्ये सांगितले आहे.
त्यामुळे जिल्ह्यात भेसळयुक्त अन्न पदार्थाची विक्री होणार नाही याकरीता सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासनामार्फत विविध ठिकाणी अचानक भेटी देवून तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये कोणीही व्यक्ती किंवा व्यावसायिक दोषी आढळल्यास संबंधीतावर विद्यामान कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे.
तसेच जिल्ह्यात कोठेही भेसळयुक्त अन्न पदार्थ विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी संबंधीताची माहिती सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांना तात्काळ द्यावी. अशी माहिती देणाऱ्या व्यक्तींची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.