पिलीव – माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथील शेतकरी पतसंस्थेच्या वतीने तालुका कार्यक्षेत्र असलेल्या असलेल्या या पतसंस्थे तर्फे दिपवाळी निमित्त लाभांश वाटप संस्थापक चेअरमन श्री भजनदास भगवान चोरमले यांच्या हस्ते १२ टक्के प्रमाणे वाटप करण्यांत आला. त्यामुळे सभासदांची दिवाळी आनंदी व गोड होणार आहे लाभांश वाटपाचे हे सलग पंधरावे वर्ष आहे.तसेच यावेळी कर्मचाऱ्यांना एक पगार दिवाळी बोनस म्हणून वाटप करण्यात आले.
या संस्थेची सभासद संख्या 675 एवढी आहे .तर संस्थेची वार्षिक उलाढाल 29 कोटी 57 लाख 78 हजार 615 रुपये. कर्ज वाटप सात कोटी 48 हजार 637 एवढे आहे.
तानाजी हरी कोपनर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चेअरमन भजनदास भगवान चोरमले, व्हा चेअरमन उत्तम सातपुते ,सचिव प्रदीप मदने, संजय वाघमोडे, संतोष कोपनर, अंकुश पांढरे ,बापू पुकळे ,भगवान शिंदे व इतर मान्यवर सभासद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते .
संस्थेस मिळालेल्या नफ्यातून सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून नवनवीन उपक्रम पतसंस्था राबवित असते यावेळी प्रतापसिंह विद्यालय चांदापुरी या शाळेस संस्थेतर्फे संगणक भेट व सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी या शाळेस प्रोजेक्टर भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. यावेळी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सर्व सभासदांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना संस्थेच्या जडणघडणीमध्ये सभासदांचा सिंहाचा वाटा असल्याने संस्था सभासदांचे हित जोपासून सामाजिक बांधिलकी ही जोपासण्याचा प्रयत्न करीत आहे. व करित राहील आभार प्रदर्शन सचिव प्रदीप मदने यांनी मानले.
संस्थापक चेअरमन भजनदास चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची घौडदौड सुरू आहे .सध्या माळशिरस तालुक्यात ग्रामीण भागात एक अग्रगण्य पतसंस्था म्हणून या संस्थेने नावलौकिक मिळविला आहे. चांदापुरी येथील शेतकरी पतसंस्थेचयावतीने लाभांश वाटप करताना चेअरमन भजनदास चोरमले.