पंढरपूर – दिवाळी निमित्त विठ्ठल मंदिरातील सुरक्षेचा ठेका घेतलेल्या बीव्हीजी कंपनीने त्यांच्या मंदिरातील कर्मचाऱ्यांना भेटवस्तू दिल्या आहेत. यामध्ये चक्क चिकन मसाला दिल्याने वारकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
बीव्हीजी कंपनीस येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला सुरक्षारक्षक पुरवण्याचा ठेका मिळाला आहे. हा ठेका मिळून काम सुरू झाल्यापासून बीव्हीजी कंपनी वारंवार वादात अडकत आहे. दर्शन रांगेतील वारकऱ्यांना मारहाण करणे, पैसे घेऊन शॉर्टकट दर्शन मिळवून देणे असे अनेक प्रकार बीव्हीजीच्या काळात घडले आहेत. मात्र बीव्हीजी कंपनीवर ठोस कारवाई झाली नाही.
दरम्यान दिवाळी निमित्त बीव्हीजी कंपनीने त्यांच्या मंदिरातील कर्मचाऱ्यांना भेटवस्तू दिल्या आहेत. यामध्ये चक्क चिकन मसाला दिल्याने वारकऱ्यांमधुन संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी संबंधित कंपनीला नोटीस दिल्याचे प्रसिद्ध माध्यमांना सांगितले आहे.
——————
कंपनीच्या पाठीशी कोण ? असा उपस्थित केला जात आहे सवाल
बीव्हीजी कंपनीला हा ठेका मिळून काम सुरू झाल्यापासून बीव्हीजी कंपनी वारंवार वादात अडकत आहे. दर्शन रांगेतील वारकऱ्यांना मारहाण करणे, पैसे घेऊन शॉर्टकट दर्शन मिळवून देणे असे अनेक प्रकार बीव्हीजीच्या काळात घडले आहेत. मात्र मंदिर प्रशासनाकडून या कंपनीवर कोणतेही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे या कंपनीच्या पाठीशी कोण आहे ? असा सवाल वारंवार वारकरी असो पंढरपूरचे नागरिक असो यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.
————————-
मी मारल्या सारखे करतो ,तु रडल्या सारखं कर
चिकन मसाला प्रकरणी मंदिर समितीच्या एका सदस्याने त्यांच्याकडून एक दिलगिरी पत्र व पॅकिंग करताना चुकून वेगळी पॅकेट्स पंढरपूरला आली असा खुलासा घेण्याच्या सूचना दिल्याने एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे बीव्हीजी कंपनीचे सर्व काळी कृत्य कोण पाठीशी घालत आहे या प्रश्नाचे उत्तर या माध्यमातून मिळाले आहे. मंदिर समितीच्या एका कर्मचाऱ्याला तशा सूचना दिल्याचे व्हाट्सअप चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
त्यामुळे मी मारल्या सारखं करतो तू रडल्या सारखं कर अशी नीती सध्या काही मंदिर समिती सदस्यां कडून राबवली जात आहे.
—————————
मंदिर समितीकडून वारकऱ्यांनी काय अपेक्षा ठेवायच्या
वारकऱ्यांना सुख सुविधा आणि सुरक्षा पुरवण्यासाठी, दर्शन रांगेचे व्यवस्थापन करण्यासाठी नेमलेल्या मंदिर समितीकडून जर बिव्हीजीला पाठीशी घातले जात असेल तर वारकऱ्यांनी या मंदिर समितीकडून काय अपेक्षा ठेवावी हा सवाल विठ्ठल भक्तांकडून
उपस्थित केला जात आहे.