सोलापूर – प्रकाशोत्सव अर्थात दीपावली सणाची सुरुवात वसुबारसने झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी निमित्त सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास श्री धन्वंतरी पूजन करून धनत्रोयादशी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आयुर्वेदाचार्य डॉ.प्रशांत बागेवाडीकर यांच्या निवासस्थानी परंपरेनुसार श्री धन्वंतरी देवाचे पूजन करून धनत्रयोदशी उत्साहात साजरी करण्यात आली. पुरोहित्यांच्या मंत्रघोषात धार्मिक परंपरेनुसार विधिवत पूजा संपन्न झाली.
सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील धार्मिक परंपरेनुसार धनत्रयोदशीनिमित्त श्री धन्वंतरी देवाचे पूजन केल्याचे डॉ. प्रशांत बागेवाडीकर यांनी सांगितले.
यावेळी डॉ.वृषाली बागेवाडीकर, डॉ.समीर बागेवाडीकर, डॉ. मधुमालती बागेवाडीकर, डॉ.पुष्कर बागेवाडीकर,डॉ. पायल बागेवाडीकर, डॉ. विजय सावस्कर आदींची उपस्थिती होती.