सोलापूर : राहत्या घरी झोपला असता, अचानक छातीत दुखून बेशुध्द झालेल्या तरुणाचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळनंतर घडली.
बब्रुवान मोतीराम जाधव (वय 36, रा. जकनी तांडा, नळदुर्ग) असे तरुणाचे नाव आहे. गुरुवारी रात्री 7.30 च्या सुमारास राहत्या घरी असताना, बब्रुवानच्या छातीत अचानक दुखू लागले. त्यात त्रास होऊन तो बेशुध्द झाला.त्याला नळदुर्ग येथील रुग्णालयात उपचार करून शनिवारी मध्यरात्री 2.40 वाजता शासकीय रुग्णालयात दाखल केले.
परंतु उपचारापूर्वीच तो मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.