सोलापूर : भाजपा शहर जिल्हा कार्यालयात नूतन पक्षप्रवेशित कार्यकर्त्यांचा सत्कार कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी पक्षाने दिलेले आगामी उपक्रम “एक दिवा वंचितांसाठी”, “आत्मनिर्भर भारत” आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती — यांविषयी शहराध्यक्षा मा. रोहिणीताई तडवळकर यांनी सविस्तर मार्गदर्शन दिले.
“एक दिवा वंचितांसाठी” या उपक्रमाविषयी सरचिटणीस डॉ. नारायण बनसोडे यांनी मार्गदर्शन केले तर सरदार वल्लभभाई पटेल जयंती कार्यक्रम संयोजक डॉ. शिवराज सरतापे यांनी जयंतीच्या नियोजनाविषयी माहिती दिली तर पदवीधर नोंदणी जिल्हा प्रमुख रुद्रेश बोरामणी यांनी पदवीधर नोंदणीविषयी सविस्तर माहिती दिली.
सरचिटणीस सुधा अळीमोरे यांनी आभार प्रदर्शन केले, उपाध्यक्ष अंबादास बिंगी, विजया वड्डेपल्ली, संजय साळुंखे, ॲड. साधना संगवे, चिटणीस अनिल कंदलगी, बजरंग कुलकर्णी, नागेश गंजी, मनोज कलशेट्टी, दिलीप पतंगे, रवी भवानी, कोषाध्यक्ष भूपती कमटम,कार्यालय प्रमुख श्रीहरी म्याकल, प्रसिद्धी प्रमुख आनंद बिरू, युवा मोर्चा अध्यक्ष विजय कुलथे महिला मोर्चा अध्यक्ष रंजित चाकोते, ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू, सुरेश पाटील, अंजली वळसा, बिज्जू प्रधाने, सुभाष डांगे, पद्माकर काळे, सुनील भोसले, मदन शिरसागर, बाळासाहेब तांबे, सुरेश तोडकरी, मंदाकिनी तोडकरी ,मंजुषा डोईजोडे, मेघराज कल्याणकर, मारुती तोडकर, विजय गायकवाड, नागनाथ बदले, संदीप चव्हाण, गोरख काटे, किरण नलवडे, नागनाथ शिरसागर, सागर भोसले, गिरीराज सिंगर, लक्ष्मण गायकवाड, रवी बंदकर , राहुल सखाराम, देविदास घुले, प्रभाकर जाधव, विश्वनाथ पाटील, विजय कोळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.