सोलापूर – जिल्ह्यासह माळशिरस तालुक्यात सप्टेंबर महीन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.यामध्ये मका,बाजरी,कांदा,डाळिंब केळी व इतर फळबागांचे प्रचंड मोठे नुकसान झाले होते .यामुळे शेतकऱ्यांनाचा हाता तोंडाला आलेला घास पावसाने पळवून नेला.
शेतकऱ्यांनचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंञी जयकुमार गोरे यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे ताबडतोब पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार रामभाऊ सातपुतें यांनी आपला बिहारचा दौरा रद्द करीत नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करीत असताना कण्हेर येथील शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन नुकसानीची माहीती दिली.
यावेळेसच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माळशिरस तालुक्यातील सर्व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना थेट मदत करण्याचे आश्वासन दिले होते.त्यानुसार माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना 63 कोटी 29 लाख रुपयांची मदत लवकरच मिळणार आहे.तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे पुर्ण झाले असुन अंतिम याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असुन लवकरच शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.
माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत मिळावी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करताना माजी आमदार रामभाऊ सातपुते.