बार्शी – श्री दत्त शिक्षण प्रसारक व बहूउऔद्देशीय मंडळ बार्शी यांचेतीने संस्थापक अध्यक्ष, श्री सतीश सातपुते यांचेऔवतीने बार्शी शहरांमधील फुटपाथ विक्रेत्यांना त्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून दीपवली फराळाचे बॉक्स सस्नेह वितरित करण्यात आले.
बार्शी तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अशोक सायकर यांचे शुभहस्ते या फराळ वाटपाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमासाठी बार्शी शहरांमधील विविध संघटनांचे मान्यवर प्रतिनिधी उपस्थित होते,
यामध्ये डॉ. रविराज फुरडे, ऍड. धारुरकर, ऍड, विक्रम आगळे, समाजसेवक बी.आर. देशमुख, सेवानिवृत्त बँक मॅनेजर बारंगुळे, दत्ता गोसावी, सौ. सुमन चंद्रशेखर तसेच भीमराव कदम, दिलीपराव साळवे, प्रा. उमाटे, प्रा. गोविंद वाघ तसेच संस्थेचे पदाधिकारी उदयन सातपुते, सौ.श्वेता चौधरी, कुमारी आर्या सातपुते आणि संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
या समाजोपयोगी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आश्रम शाळेची मुख्याध्यापक दादासाहेब डमरे आणि सौ. माई सोपल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. निकम शआणि सेवक शाहूराव वाघमारे, बापूराव साळसकर यांनी विशेष परिश्रम घेतले. सातपुते कुटुंबीय व श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ यांचेवतीने दरवर्षी सतीश सातपुते हा समाजोपयोगी उपक्रम राबवतात.