सोलापूर – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विभागांची परीक्षा जाहीर झाली असून (एमपीएससी) ९३८ पदांसाठी महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२५ घेतली जाणार आहे. दिनांक ४ जानेवारी रोजी राज्यातील विविध जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. दिनांक. ७ ऑक्टोबरपासून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला. मात्र या जाहिरातीवरून उमेदवार आणि अनेक विद्यार्थी संघटनेमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे.
जाहिरातीमधून मोटार वाहन निरीक्षक पदच गायब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मेगा भरतीची घोषणा केली असून केवळ ९०० पदांसाठी जाहिरात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेच्या जाहिरातीनुसार उद्योग निरीक्षक पदाच्या ९ जागा, तांत्रिक सहायक पदाच्या ४, कर सहायक पदाच्या ७३, तर लिपिक टंकलेखक पदाच्या ८५२ जागा भरण्यात येणार आहेत.सर्व विभागांतील रिक्त पदे ८० टक्के प्रमाणावर तातडीने भरावीत.
भरती प्रक्रिया आचारसंहितेत न अडकता पूर्ण करावी, जेणेकरून पदे भरून उमेदवारांना त्वरित रोजगार व न्याय मिळेल, अशी परीक्षार्थी विद्यार्थ्यांमधून मागणी होत आहे.
,…..
फक्त ९३८ पदांची जाहिरात प्रसिद्ध
…
कमी जागांसाठी गट-क जाहिरात प्रसिद्ध करून राज्यातील तरुणांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. हजारो जागा रिक्त असताना गट-क संवर्गाची फक्त ९३८ पदांची जाहिरात प्रसिद्ध करून राज्य सरकारने तरुणांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
…..
आरटीओ कर्मचारी भरती होणार का?
..,,
परिवहन विभागात (आरटीओ) पदाच्या शेकडो जागा रिक्त आहेत. तरीही आयोगाकडे मागणीपत्र पाठविण्यात आले नाही. लिपिक तसेच इतर गट क संवर्गीय पदांच्या हजारो जागा रिक्त असताना, कमी जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.