माढा : अतिवृष्टी व महापुरामुळे माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या अनेक गावांना फटका बसून मोठे नुकसान झाले तसेच अनेकांचे संसार वाहून गेले तर घराचे अतोनात नुकसान झाले या गोष्टीचा विचार करून पुण्यातील भारतीय विद्यापीठ परिवार माजी मंत्री विश्वजीत कदम व
ॲड चंद्रकांत कदम मित्रपरिवार कोथरूड यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी दिवाळी वस्तूंचे तांदुळवाडी रिधोरे पापनस दारफळ उंदरगाव व केवड या ठिकाणी वाटप करण्यात आले या साहित्याचे वाटप करण्यासाठी पुण्यातील मोहन आवळे विलास कदम परमेश्वर जाधव कैलास कदम बळीराम कदम सर श्री सयाजी कदम अशोक जाधव समाधान जाधव समाधान धडे उपस्थित होते. हा कार्यक्रम पार पडण्यासाठी माढा येथील पवार प्रतिष्ठान व सकल मातंग समाज माढा शहर यांच्यामार्फत सर्व सहकार्य करण्यात आले यावेळी कुंदन पवार किरण पवार रामेश्वर पवार पप्पू पवार प्रवीण पवार तानाजी जोगदंड रणजित देवकुळे निखिल पवार आदि उपस्थित होते.