अक्कलकोट – भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा पंचायत समितीचे माजी सदस्य , माजी उपसभापती विलासराव गव्हाणे यांचा जिल्हा परिषद गट राखीव झाल्याने त्यांची राजकीय कोंडी झाली आहे विलासराव गव्हाणे यांचे राजकीय पुनर्वसन झाल्यास भाजपाला अधिक बळ मिळण्याची शक्यता आहे .जेऊर जि प गटात भाजपाची बाजु भक्कम करण्यासाठी गव्हाणे यांचे पुनर्वसन आवश्यक आहे .याची चर्चा अक्कलकोट तालुक्यातील राजकीय क्षेत्रात सुरू आहे.
भाजपा नेते विलासराव गव्हाणे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना गेल्या ४५ वर्षापासून अक्कलकोट तालुक्यातील राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. ज्येष्ठ नेते विलास गव्हाणे हे पाच वेळा पंचायत समितीचे सदस्य राहिले आहेत. तसेच २०१२ साली विलासराव गव्हाणे यांच्या पत्नी विमल गव्हाणे या पंचायत समितीच्या सभापती म्हणून काम केले आहेत. जेष्ठ नेते विलासराव गव्हाणे यांचा अक्कलकोट तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांशी तसेच शेतकऱ्यांशी थेट संपर्क आहे. जनमानसातील नेता अशी ओळख विलास गव्हाणे यांनी निर्माण केली आहे.
अक्कलकोट पंचायत समिती कार्यालयात ग्रामीण भागातील जनता ही विलासराव गव्हाणे यांना भेटण्यासाठी खास येत असतात. ज्येष्ठ नेते विलासराव गव्हाणे हे शासनाच्या विविध योजना या सर्वसामान्य नागरिकांना , गरीब निराधार महिलांना , शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. अक्कलकोट तालुक्यातील हजारो लोकांना पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या मार्फत योजना मिळवून दिले आहेत. यामुळेच एक प्रभावी नेते म्हणून विलासराव गव्हाणे यांचे नाव राजकीय क्षेत्रात घेतले जाते.
विलासराव गव्हाणे हे दोड्डाळ गावच्या राजकीय क्षेत्रात ४५ वर्षे कार्यरत आहेत. गेल्या ४५ वर्षापासून सरपंच पद हे विलासराव गव्हाणे यांच्याकडेच राहिले आहे. तसेच दहिटणे पंचायत समितीच्या गणातून पाच वेळा निवडून येत पंचायत समितीमध्ये काम केले आहे. तसेच जेऊर जिल्हा परिषद गटातूनही निवडणूक लढवली आहे. पंचायत समिती दहिटणे गण हा अनुसूचित जाती महिलांसाठी तर जेऊर जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने विलासराव गव्हाणे यांना मतदारसंघ नसल्याने कोंडी झाली आहे. विलासराव गव्हाणे हे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. जेऊर गटात विलासराव गव्हाणे यांना मानणारा मतदार मोठ्या प्रमाणात आहे.
भाजपाला जेऊर गटात जर वर्चस्व राखायचे असेल तर विलासराव गव्हाणे यांचे पुनर्वसन ही करावे लागणार आहे. सर्वसामान्य माणसाची कामे करणारे विलासराव गव्हाणे यांचे पुनर्वसन हे भाजपाला बळ देणारे ठरणार आहे .विलासराव गव्हाणे यांचा शासकीय योजनांचा अभ्यास तसेच जेऊर गटातील राजकीय ताकद पाहता त्यांचे पुनर्वसन आमदार सचिन कल्याणशेट्टी करणार का याची चर्चा अक्कलकोट तालुक्यात सुरू आहे .विलासराव गव्हाणे यांना कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नसताना अक्कलकोट तालुक्यात एक वेगळी ओळख निर्माण करून हजारो लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिले आहे .
विलासराव गव्हाणे यांचे राजकीय पुनर्वसन हे भाजपासाठी फायद्याचे ठरणार आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी हे विलासराव गव्हाणे यांचे राजकीय पुनर्वसनासाठी कोणती भूमिका घेणार याकडे विलासराव गव्हाणे यांच्या समर्थकांचे व नागरिकांचे लक्ष लागले आहे.