श्रीपूर – प्रवर्तन फाऊंडेशन गेल्या ७ वर्षा पासून देशांच्या सिमांचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या सैनिकांना दिवाळी फराळ पोहोचवण्याचे काम करत आहेत . या वर्षीही परिवर्तन फाऊंडेशन , रावसाहेब चॅरिटी ट्रस्ट व पांचजन्य या संस्थांच्या माध्यमातून कश्मिर मध्ये मिठाई पावण्यात आली .
पुण्याच्या खा . डॉ . मेधाताई कुलकर्णी यांचे हस्ते मिठाई घेवून जाणाऱ्या ट्रक चे पुजन करण्यात आले .
या प्रसंगी प्रवर्तन फाऊंडशनचे अध्यक्ष व महाळूंग – श्रीपूर नगर पंचायतीचे सदस्य निनाद पटवर्धन , योगेश जोशी , गणपत कवडे , पांचजन्य चे सचिव समिर कुलकर्णी , रश्मी कुलकर्णी रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट चे प्रसाद जोशी , गणेश जगताप , विश्राम कुलकर्णी , जयंत भावे उपस्थित होते .
या विषयी अधिक माहिती देताना निनाद पटवर्धन म्हणाले की , संवेदनशिल असलेल्या कश्मिर मध्ये भारतीय सिमांचे रक्षण करणाऱ्या जवानांना डोळ्यात तेल घालून काम करावे लागते . अशा वेळी सण , समारंभ , उत्सवा पासून हे जवान पारखे होतात . त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे हाच उद्देश मिठाई देण्यामागे आहे .
श्रीपूर मधील बांधकाम व्यावसायिक संजय मोकाशी , शाम मांगले , मोहन कवडे , श्रीपाद कुलकर्णी , तर अकलुज येथिल सचिन शिन्दे या सर्वांच्या संकल्पनेतून हा उपक्रम चालू केला . दर वर्षी दिवाळीला आम्ही फराळ स्वतः नेऊन सैनिकांना भरवितो . फराळ स्वीकारताना सैनिकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान होते .
आम्ही एवढ्यावरच थांबलो नाही तर कश्मीर मधील नागरिकांच्या विशेष कुरून महिलांच्या स्वावलंबना साठी लघु उद्योग उभे करून दिले आहेत . आमचे कार्य पुण्याच्या खा . डॉ . मधाताई कुलकर्णी यांना कळल्यावर त्यांनी कश्मिर मधील दुर्गम भागातील लोकां साठी उद्ययावत रुग्णवाहिका देण्याचा निर्णय घेतला . आज त्यांचे हातूनच मिठाई नेणाऱ्या ट्रकचे पुजन केले आहे . या कार्यात पांचजन्य व रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट ही सामील झाल्याने या कार्यास नक्कीच गती येईल .
फोटो :
कश्मिर मधील सैनिकांना पाठविणेत येत असलेल्या
मिठाई ट्रकचे पुजन प्रसंगी डॉ . मेधाताई कुलकर्णी , निनाद पटवर्धन .