अकलूज – शंकर नगर अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचा64 वा ऊस गळीत हंगाम शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.श्री. विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील साहेब यांचे शुभहस्ते व कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील, मा.कु.स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील संचालिका व प्रमुख मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी विधीवत काटा व मोळी पूजन व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, मा.विश्वतेजसिंह मोहिते-पाटील, चि.सयाजीराजे मोहिते-पाटील व माजी व्हाईस चेअरमन सुरेश मेहेर यांच्या शुभहस्ते करण्यात आले तसेच
सकाळी डिस्टीलरी व ॲसेटीक ॲसिड प्रकल्पाचा उत्पादन शुभारंभ ही करण्यात आला या निमित्ताने सत्यनारायण महापूजा कारखाना संचालक महादेव जालिंदर क्षीरसागर व त्यांच्या सुविद्य पत्नी नंदा महादेव क्षीरसागर या उभयतांच्या शुभहस्ते करण्यात आली कारखान्याचे संस्थापक सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते-पाटील व कै.आक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन सभासद चंद्रकांत मगर व अप्पा मगर निमगाव यांचे शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमांमध्ये सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळी त्यांनी राज्यातील सन 2024-25 च्या गळीत हंगामाचा आढावा घेऊन गतवर्षी कारखाने कमी दिवस चालले त्यामुळे सर्वच कारखान्यांचे गाळप व साखर उत्पादन कमी झाले याचा सर्व कारखान्यांवरती आर्थिक परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. शासनाने साखर निर्यात, ईथेनाॅल वापर, साखर विक्री (एम.एस.पी.) बाबत दिर्घकालीन धोरण ठरवून साखर उद्योगाला दिलासा देणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी निरा उजवा कालव्या लगत समांतर पाईपलाईन योजना शासनाने करणे गरजेचे आहे. तसेच खाजगी कारखान्याचा सहकारी कारखान्यावर झालेला परिणाम याबाबत त्यांनी माहिती दिली.
सहकार महर्षी कारखान्याने सन 2024-25 मधील गाळपास आलेल्या ऊसाला दिपावली सणाकरिता दिलेल्या प्रति मे.टन 100/- रुपये पेमेंटसह एकूण प्रति मे.टन रक्कम रु.3,000/- ऊस दर दिला तसेच सभासदांना शेतीविषयक सुविधा, साखर, अपघात विमा व इतर सेवा सुविधा देऊन सहकार महर्षींची परंपरा कायम ठेवली आहे तसेच कर्मचारी यांना पगार, बोनस शिवाय वेतनवाढ व ऑक्टोबर 2025 पासून 10 % फरक वेतनवाढ ही लागू केलेली आहे. याबरोबर इतर सेवा- सुविधाही प्रदान केलेल्या आहेत तसेच ऊस तोडणी कंत्राटदार यांची गत हंगामातील तोडणी व वाहतुकीची बिले तसेच कमिशन व डिपॉझिटची संपूर्ण रक्कम वेळचे वेळी जमा केलेली आहे. कारखाना स्थापनेपासून कारखान्याचा वजन काटा हा अचूक व विश्वासात पात्र आहे. तसेच कारखान्याने नवीन सीबीजी कॉम्प्रेसर बायोगॅस व सोलर वीज निर्मिती सारखे प्रकल्प हाती घेतले आहेत.
ऊसाचे संगोपन व उत्पादन याबाबतचे सभासदांसाठी ए.आय.कृत्रिम बुद्धिमत्ता सारखे तंत्रज्ञान योजना कारखाना राबवत आहे त्यामध्ये जास्तीत जास्त सभासदांनी सहभाग नोंदवावा. कारखाना कार्यक्षेत्रातील काही भागांमध्ये अतिवृष्टीमुळे ऊसाचे नुकसान झाले आहे परंतु गतवर्षीपेक्षा ऊसाची उपलब्धता चांगली होणार आहे यामुळे हंगाम जादा दिवस चालणार असून साधारणतः 11 लाख मे.टन ऊस गाळप आपल्या कारखान्यास अपेक्षित आहे. ऊस गाळपासाठी कारखाना ऑफ सिझन मधील मशिनरी व इतर सर्व कामे पूर्ण झाली असून दैनंदिन गाळपासाठी आवश्यक असणारी सर्व तोडणी वाहतूक यंत्रणा कारखाना स्थळावर व कार्यक्षेत्रात दाखल झालेली आहे. ऊस उत्पादकांनी आपला पिकवलेला सर्व ऊस या कारखान्यास देऊन विश्वासाचे नाते अधिकाधिक दृढ करून सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी कारखान्याचे तज्ञ संचालक व माजी व्हॉईस चेअरमन ॲड. प्रकाशराव व्यंकटराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी केले. सदर कार्यक्रमास संचालक सर्वश्री लक्ष्मण शिंदे, सतीश शेंडगे, नानासाहेब मुंडफणे, विजयकुमार पवार, रावसाहेब मगर, संग्रामसिंह जहागिरदार, रामचंद्र सिद, रावसाहेब पराडे, अमरदीप काळकुटे, गोविंद पवार, सुभाष कटके, जयदीप एकतपुरे, रामचंद्र ठवरे, संचालिका सुजाता शिंदे, तज्ञ संचालक रामचंद्रराव सावंत-पाटील, कार्यलक्षी संचालक रणजीत रणनवरे व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टीमेडिया लेजर शो कमिटी सदस्य सर्वश्री पांडुरंग एकतपुरे, बाळासाहेब माने-देशमुख, विनायक केचे, दत्तात्रय चव्हाण, राजेंद्र भोसले, धनंजय सावंत, नामदेव चव्हाण, श्रीकांत बोडके हर्षाली निंबाळकर माजी संचालक सर्वश्री दत्तात्रय शिर्के, भिमराव काळे, सुभाष पताळे, भारत फुले, मोहनराव लोंढे, महादेवराव घाडगे, सुनील एकतपुरे, केशव ताटे-देशमुख, राजेंद्र मोहिते, विजयराव हेगडे, सभासद बंधू, खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.