अक्कलकोट – दिवाळी संपत आले असतानाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसानीचे पैसे जमा नाही झाल्याने काँग्रेस तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बांधव तहसील कार्यालय समोर खर्डा भाकरी पिठलं चटणी खाऊन काळी दिवाळी साजरी केली.
अक्कलकोट तालुक्यात अनेक गावांत शेतकरी बांधवांच्या बँके खात्यामध्ये अतिवृष्टी पावसाचे नुकसानी पैसे जमा झाले नाही. यामुळे शेतकरी बांधवानि सरकारला जाग येण्यासाठी खर्डा भाकरी पिठलं चटणी खाऊन काळी दिवाळी साजरा केली. शेतकरी मात्र आत्महत्या करत आहे अनेक शेतकऱ्यांचे पीक नुकसान जास्त झाले असतानाही शेतकऱ्यांना मात्र कमी पैसे मिळत असल्याने आज काँग्रेस पक्षाने शेतकऱ्याची बाजू घेऊन तहसीलदार कार्यालय समोर खर्डा भाकरी खाऊन काळी दिवाळी साजरा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर निषेध केला.अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावात आत्तापर्यंत शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसानीचे पैसे खात्यावर जमा झाले नाही. यासाठी शेतकरी बांधव काळी दिवाळी सण साजरा करून अनोखा आंदोलन केले.
यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, उपाध्यक्ष अशपाक भाई बाळोरगी, जिल्हा महिला अध्यक्ष सुवर्णा मलगोडा, ज्येष्ठ नेता अरुण जाधव, युवक तालुका अध्यक्ष निशांत कवडे, प्रविण हताजे, रहीम फुलारी, अमुल पाटील, राहुल गुरू, अनिल उकटाडे, गणेश कदम, श्रीशैल पाटील, खाजाप्पा पुजारी, संजय कुमार प्रचंडे,शरणू सुरवसे सह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.