सोलापूर : अज्ञात कारणातून कोयत्याने हल्ला केल्याने तरुण जखमी झाला. हा प्रकार मल्लिकार्जुन नगरात सोमवारी सायंकाळी 7.30 वाजता घडला.
संतोष अक्षयकुमार सोनकांबळे (वय 28 , रा. मल्लिकार्जुन नगर) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोमवारी रात्री 7.30 वाजता संतोष हा त्याच्या राहत्या घराजवळ थांबला होता. तेव्हा तेथे आलेल्या महेश रदडगी याने अज्ञात कारणातून कोयत्याने हल्ला केला.
या हल्ल्यात संतोष पाठीला आणि चेह-याला जखम झाली आहे. तो स्वत: खासगी रुग्णालयात उपचारास दाखल झाल्याची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.