महाराष्ट्र – महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले आहे. यामुळेच ईच्छुक उमेदवार सध्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. पिलीव जिल्हा परिषद गट हा सर्व साधारण जागेसाठी आरक्षित झाला आहे. तर पंचायत समिती गण हा ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाला आहे.2017 च्या निवडणुकीत जसे पिलीव पंचायत समिती गण व तांदुळवाडी पंचायत समिती गण ह्या दोन गणाचा मिळुन पिलीव जिल्हा परिषद गट झाला आहे .
यामध्ये पिलीव पंचायत समिती गणात सुळेवाडी,बचेरी,शिंगोर्णी ही कायमस्वरुपी दुष्काळी गावे निरा देवधर च्या योजनेत या गावांचा समावेश करून शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. तर याच जिल्हा परिषद पिलीव गटात व तांदुळवाडी पंचायत समिती गणातील कोळेगाव, फळवणी,तांदुळवाडी, मळोली, शेंडेचिच या गावांना जी गावे माचणुर विभागाला जोडलेली आहेत. या सर्व च गावांना बारमाही शेतीला पाणी देण्यासाठी तसेच कोळेगाव येथील तलाव दरवर्षीच पाण्याने भरून देण्याची मागणी ,तसेच उन्हाळ्यात पिलीव येथील एस्केप मधुन पाणी सोडणे याबाबत शेतकऱ्यांच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्या माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी संबंधित खात्याचे मंञी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमवेत थेट मंञालयात शेतकरी व मंञी महोदयाचया उपस्थित हा पाणी प्रश्न सोडविलयामुळे या जिल्हा परिषद गटातील राजकीय समीकरणे ऐन निवडणुकीच्या तोंडावर बदलयाचे चित्र आहे.
यामुळे या भागातील शेतकरी भाजपच्या मागे उभे राहिल्यास आश्चर्य वाटु नये.तसा तर हा ऐतिहासिक व महत्त्वाचा निर्णय पिलीव जिल्हा परिषद गटाची राजकीय समीकरणे ताबडतोब बदलल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या ठिकाणच्या सुळेवाडी, बचेरी, शिंगोर्णी गावचा पाण्याचा प्रश्न सुद्धा भाजपा सरकारच सोडवू शकते .
लवकरच पिलीव जिल्हा परिषद गटातील तांदुळवाडी येथे या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मंञी राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.खरेतर मोहिते पाटील किंवा इतरांना हा प्रश्न एवढ्या दिवस सत्तेत असताना सोडविता आला नाही पण भाजपाचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी हा शेतकऱ्यांचा महत्वाचा पाणी प्रश्न पिलीव जिल्ह्य परिषद गटात निर्णायक भुमिका बजाविणार हे निश्चित आहे.
फोटो._ मंञी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमवेत माचणुर उपविभागाला कायमस्वरूपी पाणी याबाबत चर्चा करताना माजी आमदार.रामभाऊ सातपुते व शेतकरी