करमाळा – श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या वर्षापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून भक्तांच्या देणगी रूपी सहकार्यातून या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे.
या अनुषंगाने दिवाळी पाडवा निमित्त वार बुधवार दिनांक २२.१०.२०२५. रोजी श्री कमलादेवी मंदिर जतन संवर्धन कामास डॉ. हर्षवर्धन सुनिता राजकुमार माळवदकर.रा करमाळा यांच्या कडून रोख देणगी ११,००१/-(रु आकरा हजार एक फक्त ) व मोहन बबन हांडे करमाळा यांच्याकडून सोन्याचे नथ अंदाजे किंमत १३,६७०\~ अर्पण केली तसेच सचिन गोपी विलीवेटी .रा करमाळा यांच्या कडून धनादेश ने देणगी ११,१११/- (रु आकरा हजार एकशे आकरा फक्त ) प्राप्त झाली.
या निमित्त श्री जगदंबा कमलादेवी मंदिर समितीकडून यांचा सत्कार पुरोहीत सुशील पुराणिक, व्यवस्थापक अशोक गाठे, यांनी केला.
श्रीकमलादेवी मंदिर जतन संवर्धन काम प्रगती प्रथावर असल्याकारणाने भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन या कामात सहकार्य करण्याचे आव्हान देखील श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आले आहे . तसेच ऑनलाईन देणगी ची सुविधा उपलब्ध आहे . संपर्क अशोक गाठे. व्यवस्थापक मो नं ९४०४७०८९२४, ९५७९९६१७७४


















