सांगोला – राजभवन आयोजित इंद्रधनुष्य युवा महोत्सव दि.५ ते ९ नोव्हेंबर रोजी डॉ.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे होत आहे. या महोत्सवामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा संघ सहभागी होत आहे. या संघामध्ये सांगोला महाविद्यालयाच्या श्रुती विजय घाडगे, साक्षी बाळासो कदम व रितेश महेश धनवडे या तीन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. विद्यापीठाच्या युवा महोत्सवामध्ये नागा लोकनृत्य आणि लावणी सादरीकरणात साक्षी कदम हिने सहभाग घेतला होता. चिट्टी एकाकिका मध्ये श्रुती घाडगे हिने सहभाग घेतला होता. तसेच महाविद्यालयास १५ पारितोषिके मिळविण्यासाठी रितेश धनवडे याचा महत्वाचा वाटा आहे.
या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.संतोष लोंढे, डॉ.रामचंद्र पवार, प्रा.प्रसाद लोखंडे, प्रा.डॉ.नवनाथ शिंदे, प्रा.एम.एस.बडवे, प्रा.विशाल कुलकर्णी, डॉ.सदाशिव देवकर, डॉ.विद्या जाधव, प्रा.अपूर्वा गोपालकर, प्रा.रोशनी शेवाळे, प्रा.तेजश्री मिसाळ, प्रशिक्षक डॉ.सिद्धार्थ सोरटे, अँड.मारुती वाघमोडे, धनंजय काजोळकर, प्रकाश पवार, विजय आलासे, रितेश साळवे, दिग्विजय जावीर, सिद्धनाथ जावीर, गोरख जावीर, प्रतिक काटे यांचे सह सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
प्रा.संतोष लोंढे संघव्यवस्थापक
या संघाचे संघव्यवस्थापक म्हणून नेतृत्व सांगोला महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा.संतोष लोंढे करणार आहेत. या निवडीचे पत्र विद्यापीठ प्रशासनाकडून नुकतेच त्यांना मिळाले आहे. प्रा.संतोष लोंढे हे गेल्या तीन वर्षा पासून या महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाची जबाबदारी पार पडत आहेत. त्यांच्या कालखंडामध्ये महाविद्यालयाच्या संघाचा यशाचा आलेख चढता राहिला आहे. नुकतीच त्यांची विद्यापीठ युवा महोत्सव संयोजन समिती सदस्य म्हणून निवड झाली आहे. सांगोला महाविद्यालयामध्ये संपन्न झालेल्या युवा महोत्सवामध्ये त्यांनी सहसमन्वयक म्हणून काम पहिले आहे.


















