मोहोळ – तालुक्यात फक्त दोनच पक्ष आहेत एक अनगरकर समर्थक आणिअनगरकर विरोधक,जे लोक मॅनेज झालेले आहेत त्यांना ओळखून या लोकांना खड्यासारखे बाजला ठेवा . व्यापक हितासाठी दोन पावले मागे यायचे माझी तयारी आहे . अनगरकर विरोधकात फूट पाडून अनगरकरांचा फायदा करून देण्यासाठी सुपारी कोणी घेतली आहे ? हे मोहोळ शहरातील तालुक्यातील जनतेने समजून घेणे आवश्यक आहे.सामान्य जनता आणि मतदार हे कधीच फुटत नसतात .
नेत्यांचा कावेबाजपणा, आणि धूर्तपणा विकली जाणारी माणसं कोण आहेत हे ओळखावे . काहीजणांनी राजकारणाचा धंदा मांडला आहे अशा दुकानदारी करणाऱ्या माणसांपासून सावध राहा कार्यकर्त्यांनी आपलं वापर त्यांच्या दुकान चालवण्या साठी होऊ देऊ नका असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केले . मोहोळ नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ येथील शिव गार्डन या ठिकाणी पद्माकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी पाटील हे बोलत होते .
याप्रसंगी ज्येष्ठ नेते राधेश्याम तात्या गायकवाड, शरद पवार गटाचे श्रीकांत गायकवाड काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर पवार,संजय विभुते ,शिवसेना (शिंदे) चे युवक तालुका अध्यक्ष चैतन्य देशमुख,अतुल क्षीरसागर, सिकंदर धोत्रे,विक्रम देशमुख, भाजपाचे महेश सोवनी ,अविनाश पांढरे अंजली वस्त्रे, प्रज्ञा बनसोडे,लता बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना मोहोळ शहराचे जेष्ठ नेते पदमाकर देशमुख म्हणाले की मोहोळ हे खूप मोठे शहर आहे . विकास करायला भरपूर संधी आहे .
यापूर्वीचे नगरसेवकही चांगले होते .परंतु नंतर त्यांच्यात स्वार्थ निर्माण झाला .त्यामुळे कामे व्यवस्थित झाली नाहीत . यासाठी सर्व मतदारानी चांगले उमेदवार देणे गरजेचे आहे . सर्वांनी एकजूटीने काम करा पक्ष कोणता का असेना आपण तो बाजूला ठेवून अनगर समर्थकांना बाजूला ठेवावे असे अवाहन करित २१ विरुद्ध शून्य असाच निकाल आला पाहिजे यासाठी मोहोळ करांनी सज्ज व्हावे असे ते म्हणाले .
यावेळी मोहोळ नगरपरिषदेबाबत विविध मान्यवरांनी आपले मते व्यक्त केलीबऱ्याच व्यक्तींनी नवीन चेहऱ्याला संधी देण्यात यावी असे मत व्यक्त करून प्रामाणिक आणि भ्रष्टाचार विरहित पुढील नगरपरिषदेतील सदस्य असावेत असे विचार मांडण्यात आले जेणेकरून निवडून आलेला सदस्य ठेकेदारी करणार नाही अशी हमी घेण्यात यावी असाही विचार पुढे आला .


















