सोलापूर : एका वीस वर्षाच्या तरुणीला तिघांनी वीटा तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली. हा प्रकार सिव्हील हॉस्पीटल मधील बी बिल्डीगजवळ शुक्रवारी सायंकाळी 6.20 वाजता घडला.
जबीन रफिक शेख (वय 20 , रा. शोभादेवी नगर, नई जिंदगी ) असे मारहाण झालेल्या तरुणीचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमरास जबीन ही सिव्हील हॉस्पीटल येथे होती. त्यावेळी तिला शाहिद ईसाक शेख, हिना शेख व इतर एक यांनी अज्ञात कारणातून विटांनी मारहाण केली. यात तिच्या डोक्याला जखम झाली. त्यानंतर ती स्वत: शासकीय रुग्णालयात दाखल झाली. परंतु उपचार सुरु असताना रात्री 9 च्या सुमारास ती रुग्णालयातून पळून गेल्याची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.


















