मोहोळ – साखर कारखानदारीही केवळ राजकारणासाठी नसून ती ग्रामीण भागाची आर्थिक व्यवस्था बळकट करणारी आहे. सरकारने अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत साखर घेतल्याने तीचे भाव सरकार वाढू देत नाही. केवळ ३० टक्के लोक साखर खातात त्यांच्या करिता साखरेचे भाव वाढत नाही.एफआरपी बरोबरच साखरेची एमएसपी वाढली पाहीजे. तरच ऊसास जादा दर देता येतो.ऊस उत्पादकांनीही कोल्हापुरच्या दराच्या विचारा बरोबरच आपल्याकडील ऊसाची गुणवत्ता व रिकव्हरी कशी वाढेल या बाबी लक्षात घेऊन ऊसाचे उत्पादन घ्यावे. असे आवाहन राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष तथा लोकनेते कारखान्याचे संस्थापक माजी आमदार राजन पाटील यांनी केले.
लक्ष्मीनगर येथील लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याच्या २२ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ आज कारखाना स्थळावर प्रगतशील शेतकरी आण्णासाहेब गणपतराव देशमुख (पेनूर) यांच्या हस्ते ऊसाच्या पहिल्या मोळीचे पूजन करून गव्हाणीत टाकून करण्यात आला. त्याप्रसंगी राजन पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार यशवंत माने होते.
प्रारंभी पाटकुल ( ता मोहोळ) येथील ऊस उत्पादक शेतकरी बाळासाहेब वसेकर व त्यांच्या पत्नी मनिषा या उभयतांनी सत्यनारायणाची पूजा केली. त्याचे पौरोहित्य बाजीराव जोशी यांनी केले.
यावेळी बोलताना संस्थापक राजन पाटील पुढे म्हणाले की ऊस उत्पादकांना चार हजार रुपये दर देण्याची कारखान्यांची क्षमता निर्माण करण्यासाठी साखरेसह इतर उपपदार्थांच्या किंमती वाढवल्या पाहीजेत. सरकारने धोरणे बदलली पाहीजेत असे प्रतिपादन सहकार परिषदेचे अध्यक्ष ना राजन पाटील यांनी येथे केले
यावेळी मान्यवरांनी लोकनेते( स्व) बाबुराव आण्णा पाटील अनगरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून अभिवादन केले याप्रसंगी आण्णासाहेब देशमुख ,माजी आमदार यशवंत माने दीपक माळी देवानंद गुंड यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी चेअरमन बाळराजे पाटील, संचालक अजिंक्यराणा पाटील, तावजी पाटील, जालींदर लांडे, नाना डोंगरे, विक्रांत माने, प्रकाश चवरे, अशोक चव्हाण, शुक्राचार्य हावळे, मदनसिंह पाटील, संदीप पवार, संभाजी चव्हाण, दीपक माळी, अस्लम चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश जोगदे, आदीसह तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याचे अधिकारी पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते. संचालक प्रकाश चवरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
सर्वांबरोबर ऊस दर देणार..
२६५ या ऊसाचे वाण सोडून ८६०३२ अगर तत्सम ऊसाच्या वाणास शंभर रूपये जादा दर ८६०३२ या वाणाच्या ऊस लागवडीसाठी बीनव्याजी ऊस बेणे देणार आहोत. कारखाना सुरु होताच सभासदांना साखरेचे वाटप करण्यात येणार आहे.शेतकऱ्यांनी एफआरपीसाठी एकरकमेची मागणी न करता गुजरात प्रमाणे टप्याटप्याने ती घेतल्यास शेतकऱ्यांचा व कारखान्यांचाही फायदा होतो. शेतकर्यांना त्यांच्या उत्पादनांचा रास्त दर मिळायलाच पाहीजे. ऊस उत्पादकांचे हित साधण्याबरोबर जागतिक बाजारातील साखरेचे दरातील चढ-उतारामुळे मोठी कसरत करून कुशल अर्थ नियोजनाने साखर कारखाने आणि ऊस शेती टिकवणे आवश्यक आहे.
ना.राजन पाटील अध्यक्ष राज्य सहकार परिषद
साखर क्षेत्राचा गाढा अभ्यास असलेल्या संस्थापक राजन पाटील यांनी कारखान्याच्या तांत्रिक बाबींवर देखील चांगले लक्ष दिले आहे. चेअरमन बाळराजे पाटील, संचालक अजिंक्यराणा पाटील यांच्या कुशल नियोजनातून कारखान्याने यंदा हार्वेस्टिंगच्या माध्यमातून जास्तीत जास्त उसाची तोडणी करण्याबरोबर अत्याधुनिक हार्वेस्टिंगशी अनुकूल असलेल्या गव्हाणीची देखील निर्मिती केली आहे. त्यामुळे यंदा कारखाना गतिमान कार्यशैलीने चालुन शेतकऱ्यांचा ऊस वेळेत कारखान्याला येणार आहे.केवळ कारखान्याची उभारणी करून न थांबता दरवर्षी विक्रमी उसाचे गाळप करत तालुक्यामध्ये सातत्याने अव्वल क्रमांक मिळवणाऱ्या लोकनेते पॅटर्नचा आदर्श जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी घ्यावा.
यशवंत माने माजी आमदार मोहोळ



















