Tuesday, May 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ऊस उत्पादन आणि साखर कारखानदारीमुळेच ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट

तरुण भारतbyतरुण भारत
October 26, 2025
in solapur
0
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोहोळ – साखर कारखानदारीही केवळ राजकारणासाठी नसून ती ग्रामीण भागाची आर्थिक व्यवस्था बळकट करणारी आहे. सरकारने अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत साखर घेतल्याने तीचे भाव सरकार वाढू देत नाही. केवळ ३० टक्के लोक साखर खातात त्यांच्या करिता साखरेचे भाव वाढत नाही.एफआरपी बरोबरच साखरेची एमएसपी वाढली पाहीजे. तरच ऊसास जादा दर देता येतो.ऊस उत्पादकांनीही कोल्हापुरच्या दराच्या विचारा बरोबरच आपल्याकडील ऊसाची गुणवत्ता व रिकव्हरी कशी वाढेल या बाबी लक्षात घेऊन ऊसाचे उत्पादन घ्यावे. असे आवाहन राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष तथा लोकनेते कारखान्याचे संस्थापक माजी आमदार राजन पाटील यांनी केले.

लक्ष्मीनगर येथील लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याच्या २२ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ आज कारखाना स्थळावर प्रगतशील शेतकरी  आण्णासाहेब गणपतराव देशमुख (पेनूर) यांच्या हस्ते ऊसाच्या पहिल्या मोळीचे पूजन करून गव्हाणीत टाकून करण्यात आला.   त्याप्रसंगी  राजन पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार यशवंत माने होते. 

प्रारंभी पाटकुल ( ता मोहोळ) येथील ऊस उत्पादक शेतकरी बाळासाहेब वसेकर व त्यांच्या पत्नी मनिषा या उभयतांनी सत्यनारायणाची पूजा केली. त्याचे पौरोहित्य बाजीराव जोशी यांनी केले.

यावेळी बोलताना संस्थापक राजन पाटील पुढे म्हणाले की ऊस उत्पादकांना चार हजार रुपये दर देण्याची  कारखान्यांची क्षमता निर्माण करण्यासाठी साखरेसह इतर उपपदार्थांच्या किंमती वाढवल्या पाहीजेत. सरकारने धोरणे बदलली पाहीजेत असे प्रतिपादन सहकार परिषदेचे अध्यक्ष ना राजन पाटील यांनी येथे केले 

यावेळी मान्यवरांनी  लोकनेते( स्व) बाबुराव आण्णा पाटील अनगरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून अभिवादन केले याप्रसंगी आण्णासाहेब देशमुख ,माजी आमदार यशवंत माने दीपक माळी देवानंद गुंड यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी चेअरमन बाळराजे पाटील, संचालक अजिंक्यराणा पाटील, तावजी पाटील, जालींदर लांडे, नाना डोंगरे, विक्रांत माने,  प्रकाश चवरे, अशोक चव्हाण, शुक्राचार्य हावळे, मदनसिंह पाटील, संदीप पवार, संभाजी चव्हाण, दीपक माळी, अस्लम चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश जोगदे,  आदीसह तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याचे अधिकारी पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते. संचालक प्रकाश चवरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

सर्वांबरोबर ऊस दर देणार..

२६५ या ऊसाचे वाण सोडून ८६०३२ अगर तत्सम ऊसाच्या वाणास शंभर रूपये जादा दर ८६०३२ या वाणाच्या ऊस लागवडीसाठी बीनव्याजी ऊस बेणे देणार आहोत. कारखाना सुरु होताच सभासदांना साखरेचे वाटप करण्यात येणार आहे.शेतकऱ्यांनी एफआरपीसाठी एकरकमेची मागणी न करता गुजरात प्रमाणे टप्याटप्याने ती घेतल्यास शेतकऱ्यांचा व कारखान्यांचाही फायदा होतो. शेतकर्यांना त्यांच्या उत्पादनांचा रास्त दर मिळायलाच पाहीजे. ऊस उत्पादकांचे हित साधण्याबरोबर जागतिक बाजारातील साखरेचे दरातील चढ-उतारामुळे मोठी कसरत करून कुशल अर्थ नियोजनाने साखर कारखाने आणि ऊस शेती टिकवणे आवश्यक आहे.

ना.राजन पाटील अध्यक्ष राज्य सहकार परिषद

साखर क्षेत्राचा गाढा अभ्यास असलेल्या संस्थापक राजन पाटील यांनी कारखान्याच्या तांत्रिक बाबींवर देखील चांगले लक्ष दिले आहे. चेअरमन बाळराजे पाटील, संचालक अजिंक्यराणा पाटील यांच्या कुशल नियोजनातून कारखान्याने यंदा हार्वेस्टिंगच्या माध्यमातून जास्तीत जास्त उसाची तोडणी करण्याबरोबर अत्याधुनिक हार्वेस्टिंगशी अनुकूल असलेल्या गव्हाणीची देखील निर्मिती केली आहे. त्यामुळे यंदा कारखाना गतिमान कार्यशैलीने चालुन शेतकऱ्यांचा ऊस वेळेत कारखान्याला येणार आहे.केवळ कारखान्याची उभारणी करून न थांबता दरवर्षी विक्रमी उसाचे गाळप करत तालुक्यामध्ये सातत्याने अव्वल क्रमांक मिळवणाऱ्या लोकनेते पॅटर्नचा आदर्श जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी घ्यावा.

यशवंत माने माजी आमदार मोहोळ

Post Views: 41
Previous Post

फिट येऊन पडल्याने उळेतील तरुणाचा मृत्यू

Next Post

युनिव्हाच्या धडकेने महिला ठार, ढाळेवाडी येथील घटना

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

युनिव्हाच्या धडकेने महिला ठार, ढाळेवाडी येथील घटना

ताज्या बातम्या

अवैधरीत्या वाळू उत्खनन व वाहतुकीवर कारवाई 

अवैधरीत्या वाळू उत्खनन व वाहतुकीवर कारवाई 

May 26, 2026

दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल; तिघे मित्र जखमी 

May 26, 2026
धिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद :  कार्यकारीअधिकारी राजेंद्र शेळके

धिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद :  कार्यकारीअधिकारी राजेंद्र शेळके

May 26, 2026
सिध्देश्वर प्रशाला साखर कारखाना कुमठे येथे माजी विधार्थ्यांचा मेळावा उत्साहात

सिध्देश्वर प्रशाला साखर कारखाना कुमठे येथे माजी विधार्थ्यांचा मेळावा उत्साहात

May 26, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त धनगर समाजाचा १० वा वधू-वर पालक परिचय मेळावा संपन्न

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त धनगर समाजाचा १० वा वधू-वर पालक परिचय मेळावा संपन्न

May 26, 2026

किटलीची जागा घेतली थर्मासने

May 26, 2026
२० वर्षांपासून भंगार व्यावसायिकाचा न्यायासाठी संघर्ष ; अन्यथा दुकानाच्या जागेवर जिवंत समाधी घेण्याचा इशारा

२० वर्षांपासून भंगार व्यावसायिकाचा न्यायासाठी संघर्ष ; अन्यथा दुकानाच्या जागेवर जिवंत समाधी घेण्याचा इशारा

May 26, 2026

विना परवाना दर्शनास प्रवेश दिल्या प्रकरणी मंदिर समितीच्या दोन कर्मचाऱ्यांवरगुन्हे दाखल

May 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0879781

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697