अक्कलकोट – अक्कलकोट नगरपालिका आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे प्रभाग क्र.५ इंदिरा नगर येथे सार्वजनिक महिला शौचालयाची तोडलेला दरवाजा दुरुस्त केले जात नाही.यामुळे गरीब महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे.महिलांच्या सन्मानासाठी आठ दिवसात दरवाजे दुरुस्त करावी अन्यथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट युवक शहराध्यक्ष सौरभ लांडगे यांच्या नेतृत्वाखाली हलगी नाद आंदोलन छेडण्याचे इशारा देण्यात आला आहे .
येथील शहरातील प्रभाग क्रमांक ५ वार्ड क्रमांक ९ मधील पी के पान शॉप च्या समोर व इंदिरानगर येथील सार्वजनिक शौचालय ची अवस्था, डागडुजी न करता या तुटलेल्या शौचालय आणि तसेच महिलांची सार्वजनिक शौचालयला दोन्ही बाजूनी लोखंडी गेट नाही. या गेटची दुरुस्ती करून सर्व शौचालय साफ लवकरात लवकर करावी.गटारीतील घाणी मुळे तिथल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आला आहे.तेथील लोकांची दैनंदिन अवस्था पाहता खूप हालाकीची आहे. नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना फोन करून अथवा नगरपालिकांच्या सी ओ यांना पत्र व्यवहार करून देखील अशीच अवस्था आहे.
येथील महिला शौचालयाची संपूर्ण कंपाउंडच्या आतील परिसरात घाण पसरल्याने सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाला आहे.या मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.या सार्वजनिक शौचालयाची नियमित देखभाल, दुरुस्ती, स्वच्छता करणे नगरपरिषद आरोग्य विभागाचे कर्तव्य आहे. मात्र येथील देखभाल दुरुस्ती हे बांधकाम विभागाचे असल्याची आरोग्य अधिकारी शेंडगे यांनी सांगून स्वतःचे जबाबदारी झटकत आहे.भ्रष्टाचाराने पोखरेलेले प्रशासन दुरुस्ती व स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे गरीब महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे.याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अक्कलकोट शहर युवक अध्यक्ष सौरभ लांडगे व त्यांच्या मित्र मंडळांनी गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार समक्ष भेटून सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. परंतु अद्याप दुरुस्ती करून स्वच्छता केली नाही. यामुळे नगरपालिकेत आंधळा दळतोय अन् कुत्रा पीठ खातोय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भ्रष्टाचार, मनमानी कारभारात मग्न असलेले आरोग्य विभाग या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. या कामात हलगर्जीपणा झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आला आहे. शासनाने किती जरी चांगल्या योजना राबविल्या अन् योजना राबविणारे अधिकारी जर कामचुकार राहिले तर त्या योजनांचा फज्जा उडायला वेळ लागणार नाही, अशी चर्चा सध्या सुरु आहे.
सद्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता आहे. नादुरुस्त शौचालयाची तात्काळ पाहणी करून दुरुस्त करण्यात यावी म्हणून अनेकवेळा फोन व समक्ष भेटून अर्जाद्वारे मागणी केली आहे. सर्वच शौचालयांना तात्काळ नवीन दरवाजे बसविण्यात यावे. नियमित पाण्याची व्यवस्था करावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या माध्यमातून हलगी नाद आंदोलन सह चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल.
-सौरभ लांडगे, अध्यक्ष, अक्कलकोट शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस




















