अक्कलकोट – श्री दत्त गुरुचे अवतार श्री स्वामी समर्थ महारजांच्या दर्शनार्थ दिपावली सुट्टी कालावधीत भाविकांचा जनसागर उसळल्याचे दिसुन आले . वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ श्री गुरु मंदिर राजेराय मठ समाधी मठ बॅगेळी विश्रांती धाम शिवपुरी आदि ठिकाणी स्वामी दर्शनार्थ भाविकाचां जन सागर उसळल्याचे आढळुन आले . लाखो भाविकांची उपस्थिती . मैंदर्गी रस्ता मंगरुळे चौक बाह्य वळण रस्ता एव न चौक नगर पालिका कमला राजे चौक, थडगे बाग मळा जुना राजवाडा परिसर आदि भागात प्रचंड वाहने मिळेल त्या जागेवर उभी होती . दिपावली सुट्टीत होणारी प्रचंड गर्दी पाहता भाविकांच्या वाहनाला स्वतंत्र वाहन तळ दिशा दर्शक फलक पिण्याचे पाणी सोय ‘ वाहनाची संख्या पाहता पुरेशा पोलीस बंदोबस्त गृहरक्षक दल प्राथमिक उपचार केंद्र अग्निशमन यंत्रणा तात्पुरते प्रसाधन गृह आपतकाली न यंत्रणा पुर्व तयारी बैठक नियोजन याबाबत कुठलीच दक्षता घेतली नाही यामुळे मोठया प्रमणात भाविकाचा उसळलेला जनसागर यांच्या सोयी सुविधा बाबत भाविकातुन तीव्र संताप व्यक्त करण्यात आला .
अक्कलकोट तीर्थक्षेत्री स्वामी दर्शनार्थ दिपावली सुट्टी काळात प्रचंड प्रमाणात भाविकांची गर्दी झाल्याचे दिसुन आले . सुट्टी काळात प्रचंड प्रमाणात होणारी भाविकांची गर्दी दुचाकी चार चाकी वाहने पार्किंग करिला स्वतंत्र अतिरिक्त व्यवस्था अतिरिक्त . . गृहरक्षक दल पोलीस यंत्रणा दिशा दर्शक फलक तात्पुरते अतिरिक्त प्रसाधन गृह पिण्याचे पाणी प्राथमिक उपचार केंद्र मार्गदर्शक केंद्र अग्निशमन यंत्रणा आपतकालीन यंत्रणा या बाबत पुरेसी दक्षता व नियोजन बैठक घेण्यात आली नाही महसुल प्रशासन नगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन संयुक्त विद्यमाने भाविकांच्या सोयी सुविधा बाबत दक्षता घेतली नसल्या बाबत भाविकात तीव्र नाराजी व्यक्त होत होती.
वटवृक्ष मंदिर २० तास दर्शनार्थ खुले भाविकांना पहाटे ४पासुन स्वामी दर्शन
तीर्थक्षेत्र अक्कलकोटी स्वामी दर्शनार्थ येणाऱ्या भाविकाचा प्रचंड ओघ पाहता वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थान मंदिर पहाटे ४ पासुन दर्शनार्थ खुले ठेवण्यात आले आहे . २० तास सलग भाविकांनां स्वामी दर्शनार्थ मंदिर खुले ठेवण्यात आल्याने भाविकाची सोय झाली आहे .




















