अकलूज – अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती भरवत असलेल्या घोडेबाजार आता चांगलाच नावारोपाला आलेला आहे. बाजार समिती अकलूजने घोड्यांसाठी धावण्याच्या विविध स्पर्धा आयोजित केल्यास देशासह परदेशाचे नागरीक येथे हजेरी लावतील व अकलूजचे पर्यटनही वाढीला लागेल. त्याचबरोबर घोडे निगराणीसाठी तज्ञ डॉक्टरांचे शिबिर आयोजित करावे या सूचना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केल्या.
अकलूज येथे दिवाळी पाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेला घोडेबाजाराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, बाजार समितीच्या मका हमीभाव केंद्र व कोल्ड स्टोरेज करिता शासनाकडे पाठपुरावा करू असे आश्वासन खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिले.

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने दिवाळी पाडवा निमित्ताने आयोजित केलेल्या १७ व्या घोडे बाजाराचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, आ.रणजीतसिंह मोहिते पाटील, आ.उत्तमराव जानकर, सयाजीराजे मोहिते पाटील,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, अतुल चव्हाण, रणजीत चौरे, बाबाराजे देशमुख, उपसभापती मामासाहेब पांढरे, रामचंद्र सावंत पाटील, देविदास ढोपे यांच्यासह बाजार समितीचे आजी माजी सदस्य, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी बहुसंख्येने उपस्थित होते.
प्रस्ताविकात मदनसिंह मोहिते पाटील यांनी अकलूज च्या घोडेबाजाराचा देश पातळीवर लौकिक आहे. इथे व्यापाऱ्यांना व घोड्यांना सर्व सुविधा दिल्या जातात. पाडव्या अगोदरच दोन महिन्यापासून व्यापारी इथे येत असल्याचे सांगून बाजार समितीच्या कार्याचा आढावा घेतला. तर सचिव राजेंद्र काकडे यांनी घोडेबाजारात आतापर्यंत ७२० घोड्यांची आवक झाली असुन एक कोटीपेक्षा अधिक रुची उलाढाल झाली आहे. घोडे बाजारात ७०० ते ८०० Send दाखल होणार असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन धनंजय देशमुख यांनी केले तर आभार नितीन सावंत यांनी मानले.




















