सोलापूर – चिंचोली भोसे पंढरपूर(जि. सोलापूर) तालुक्यातील १२०० लोकसंख्या असणारे छोटस गाव याच गावातील पवार मळा १०० लोकांची वस्ती असणाऱ्या ठिकाणच्या मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील मुलीची म्हणजेच कु..भक्ती गणेश पवार हिची आज BCCI अंतर्गत होणाऱ्या T- 20 स्पर्धेसाठी १९ वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली .
आई आणि वडील या दोघाकडील घरची पार्श्वभूमी हि पांडुरंगच्या भक्तीची असल्याने घरातल थोरलं कन्यारत्न असल्या कारणामुळे “भक्ती” हे नाव ठेवण्यात आले.शाळेत अभ्यासाप्रमाणे च चित्रकलेत प्राविण्य मिळवणाऱ्या भक्तीला मात्र क्रिकेट मधला “रस” हा काही शांत बसू देत नव्हता .मुळातच क्रिकेट सारख्या अति प्रचंड स्पर्धा असणाऱ्या खेळात अन त्यात महिला क्रिकेट तरी सुद्धा बापाने धोका पत्करत “ म्हारी छोरी छोरो से कम हे के “ असे म्हणत पंढरपुरातील नागेश साळुंखे याच्या क्रिकेट अकादमीत दाखल केले .नागेश साळुंखे सरांनी सुद्धा भक्ती मधील गुणवत्ता ओळखून तिच्या तील क्रिकेटमधील कौशल्याला पैलू पडायला चालू केले परीणाम स्वरूप उजव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या या पोरीने शालेय स्तरावर ,जिल्हा स्तरावरच्या क्रिकेट स्पर्धा गाजवायला चालू केल्या .पण हाच तिचा क्रिकेट चा प्रवास वाटतो तेवढा सोपा नव्हता कारण गेली ८ -१० वर्ष पहाटे सराव ,दिवसा शाळा ,रात्री पुन्हा सराव वेळप्रसंगी पुणे येथील अकादमीत महिनो न महिना सराव त्यात शाळेचा अभ्यास अशी तारेवरची कसरत करून भक्तीने बापाच्या आणि पवार कुटुंबाच्या कष्टाच चीज केल.तिच्या या निवडीने आज गाव बरोबर तालुक्याच नाव राज्यात गाजलं यात तिची विलक्षण जिद्द ,कोठर व अविरत परिश्रम, जबरदस्त आत्मविश्वास या गुणाचा संगम दिसून येत आहे.
असे म्हणतात कि “पहिली बेटी ,धनाची पेटी” अन काल धन त्रयोदशीच्या मुहूर्तावर भक्तीची महाराष्ट्राच्या संघामध्ये निवडीची घोषणा हि तालुक्यातील क्रिकेट मध्ये कारकीर्द करू इच्छीनाऱ्या पोरीनसाठी प्रेरणा असेल .भविष्यात भक्ती राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील विविध फॉरमॅट गाजवेल यात तिळमात्र शंका नाही.भक्तीला क्रिकेट मधील पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा …….




















