सोलापूर – बांधकाम साईटवर काम करीत असताना वीजेचा धक्का लागल्याने एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे, गुरुश्रीत लाखा सिंग (वय २३, रा.पंजाब. सध्या रा. वडाळा, ता. उत्तर सोलापूर)असे वीजेचा शॉक लागून मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
ही घटना रविवारी दुपारी दिडच्या सुमारास उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा या ठिकाणी घडली. गुुरुश्रीत हा रविवारी सकाळी दिडच्या वाजण्याच्या सुमारास इंटेक्स स्ट्रक्सचर चे वडाळाच्या पुढे साडेतीन किमी अंतरावर काम सुरु आहे. कॅनलचे नवीन बांधकामाचे चालू कामावर लाईटचे कनेक्शनचे काम करत असताना त्यास वीजेचा शॉक लागला.
शॉक लागल्याने गुरुश्रीत हा बेशुध्द पडला, त्यास बेशुध्द आवस्थेत वडाळा येथील सरकारी दवाखाना येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचार करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बांधकाम इंजिनिअर अक्षय नरळे यांनी दाखल सायंकाळी पाच च्या सुमारास दाखल केले. तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉ. पूजा लवटे यांनी जाहीर केले, या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.



















