सोलापूर : हल्लीच्या जमान्यात सामाजिक कार्य करणे एवढे सोपे नाही. समाजात काही घटकांकडून अशा कार्य करणाऱ्या समूहाच्या विरोधात टोकाची भूमिका घेतली जाते. पदोपदी अडचणी येत असतात अशा परिस्थितीत सुद्धा स्व. हरिश्चंद्र गायकवाड प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार माजी जि. प. सदस्य बाळासाहेब देशमुख यांनी काढले
स्व. हरिश्चंद्र गायकवाड बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्नेहबंध पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थापक अध्यक्ष कृष्णात गायकवाड, प्राचार्य उत्तरेश्वर मुंडे, रामचंद्र हक्के, पत्रकार भरतकुमार मोरे ,श्रीकांत कांबळे, एड. दत्तात्रेय सरडे, डॉ. देविदास फाळके, संस्थेचे अध्यक्ष पंढरी कदम, डॉ. सतीश चव्हाण, रणजीत थिटे ,सुमित्रा माने आदीं मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रारंभी संस्थापक कृष्णात गायकवाड यांनी प्रास्ताविक व संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. प्राचार्य उत्तरेश्वर मुंडे यांनी सद्यस्थितीत विद्यार्थ्यांची शालेय सुरक्षितता महत्वाची असल्याचे प्रतिपादन केले. पत्रकार भरत कुमार मोरे यांनी पुरस्कार हे भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देतात असे सांगितले तर सुमित्रा माने यांनी महिलांनीही आत्म निर्भयतेने पुढे यावे असे आवाहन केले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या जवळपास५६ पुरस्कार विजेत्यांना पुरस्काराने गौरवण्यात आले. गौरव चिन्ह, शाल प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.यावेळी दिगंबर पवार या युवकांनी बहारदार लावणी सादर केली. प्रास्ताविक पंढरी कदम यांनी तर सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता अनिता चौधरी यांनी केले तर आभार कृष्णात गायकवाड यांनी मांनले.
यांचा झाला पुरस्काराने सन्मान
प्रा. भास्कर बंगाळे, सुनील विश्वासे , प्राचार्य उत्तरेश्वर मुंढे, राजू सुरवसे रमेश सोळसे ,विजय शेळक-ऍड. सारंग वांगीकर, ॲड. शक्ती माने , एड. प्रताप शेळके, महादेव पुजारी, संजय सांगोलकर, सुनील गुरव, शंकर यादव ,वीणा पवार,मंगल मस्के, डॉ.सुनील गावंधरे वैशाली टंकसाळी प्रशांत सरवदे , रश्मी ब्राह्मणे,अंजली देशमाने , कुशल वर्तक, संदीप पाटील, सीमा बागल, विशाल गायकवाड, दिपाली बाविस्कर, प्रतिभा मस्तूद ,मुकेश भगत, सुधीर देवकते,निलांबरी पिल्लई, सुनीता देशपांडे, ऍड. सारिका गायकवाड माने,डॉ. मृदुला तळेकर ,ज्योती शिंदे, डॉ.सतीश चव्हाण, संजय पवार , रियाज मुलानी, दिलीप थोरात, मधुकर जमदाडे,सुमित्रा माने रणजीत थिटे आदी.




















